Actress Alleges On Young Politician: 'आज फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रूम बुक केलीय, यावंच लागेल...'; सुप्रसिद्ध अभिनेत्रीला तरुण राजकीय नेत्याचा 'तो' घाणेरडा मेसेज
Malayalam Actress Rini Ann George Alleges Young Politician: अभिनेत्रीनं केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी हादरली आहे. अभिनेत्रीनं राजकीय नेत्यावर नको ते मेसेज पाठवून त्रास देत असल्याचा आरोप केला आहे.

Malayalam Actress Rini Ann George Alleges Young Politician: सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी हादरली आहे. एका राजकीय नेत्याकडून (Politician) तिला कित्येक दिवस आक्षेपार्ह्य मेसेज पाठवण्यात आल्याचा दावा अभिनेत्रीनं केला आहे. तसेच, अभिनेत्रीला एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये येण्याची ऑफरही दिलेली. दरम्यान, अभिनेत्रीनं त्या नेत्याचं नाव मात्र घेतलं नाही. पण, अभिनेत्रीनं केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
'हिंदुस्तान टाईम्स'च्या वृत्तानुसार, मल्याळम चित्रपट स्टार रिनी एन जॉर्जनं (Rini Ann George) राजकीय नेत्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे सिनेविश्वात आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अभिनेत्रीनं त्या राजकीय नेत्याला अनेकदा इशारा दिला आणि त्या पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रारही केली. पण, त्या नेत्याचं वागणं काही थांबलं नाही. अभिनेत्रीला त्या राजकीय नेत्याचं नाव वारंवार विचारल्यानंतरही तिनं राजकीय नेत्याचं नाव उघड करायला नकार दिला. दरम्यान, अभिनेत्रीनं ज्या नेत्यावर खळबळजनक आरोप केले आहेत, तो आमदार असल्याचं सांगितलं जात आहे.
मल्याळम अभिनेत्री रिनी ॲन जॉर्ज हिनं कोचीमध्ये पत्रकार परिषद घेत एका मोठ्या राजकीय पक्षाच्या युवा नेत्यावर गंभीर आरोप केले. हा युवा नेता तीन वर्षांपासून गैरवर्तन करत असल्याचा आरोप तिनं केला आहे. तक्रार करूनही वरिष्ठ सदस्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही तिनं पत्रकार परिषद केला. अभिनेत्रीनं सांगितलं की, सोशल मीडियाद्वारे तिची त्या राजकीय नेत्याशी ओळख झाली होती. तीन वर्षांपूर्वी त्यानं आक्षेपार्ह मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. विरोध केल्यावर त्यानं दुर्लक्ष केलं. इतर महिलांनाही त्रास झाल्याचा आरोप तिनं केला आहे. पोलिसांत तक्रार केल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती तिला वाटत होती, त्यामुळं तिनं तक्रार दाखल केली नाही, असंही तिनं सांगितलं. मात्र आता इतर महिलांसोबत असं काही घडू नये, यासाठी आवाज उठवत असल्यांही अभिनेत्रीनं माध्यमांशी बोलताना सांगितलं.
अभिनेत्रीला धमकवायचा 'तो' राजकीय नेता
सोशल मीडियाच्या माध्यमातून माझा त्या राजकारण्याशी संपर्क आला. तीन वर्षांपूर्वी त्यानं मला आक्षेपार्ह मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. जेव्हा मी त्याला हे सगळं उघडकीस करण्याची धमकी दिली, त्यावेळी त्यानं दिलेलं उत्तर ऐकून मला खूप धक्का बसला. "जा कोणाला सांगायचं आहे, त्याला जाऊन सांग... कोणाला काहीही देणं घेणं नाहीये...", असं तो राजकीय नेता म्हणाल्याचं अभिनेत्रीनं सांगितलं.
त्यानं एकदा फाइव्ह-स्टार हॉटेलमध्ये रूम बुक केल्याचंही सांगितलेलं, अभिनेत्रीचा दावा
मल्याळम अभिनेत्री रिनी ॲन जॉर्ज हिनं राजकीय नेत्यावर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. इतरही अनेक महिलांसोबत त्या राजकीय नेत्यानं दुष्कृत्य केल्याचंही अभिनेत्रीनं सांगितलं. रिनी ॲन जॉर्ज म्हणाली की, इतर अनेक महिलांनाही असा त्रास सहन करावा लागला आहे. माझ्यावर कोणताही हल्ला झाला नाही, पण मला असे अनेक मेसेज आले आहेत. त्यानं एकदा मला फाइव्ह-स्टार हॉटेलमध्ये रूम बुक केल्याचं सांगितलं होतं, तू यायला पाहिजे, असं तो म्हणाला. तेव्हा मी त्याला सडेतोड उत्तर दिलेलं. तेव्हा काही काळ त्रास झाला नाही. पण नंतर, त्यानं मला पुन्हा मेसेज पाठवण्यास सुरुवात केली, असा दावा तिनं केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























