'बाल्कनीत पेपर वाचण्याची सवय, पण फक्त चप्पल दिसली, खाली पाहिले तर वॉचमन...'; मलायकाच्या आईने डोळ्याने पाहिले ते सांगितले!
Malaika Arora Father Death: वांद्रे पोलिसांनी एडीआर दाखल करून अनिल अरोरा पार्थिव शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या विलेपार्ले पश्चिमेकडे कुपर रुग्णालयात पाठविले आहे.
Malaika Arora Father Death: अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांनी आज राहत्या इमारतीमधील सहाव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. अनिल अरोरा यांच्या निधनाची बातमी समजतात चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार सकाळपासूनच मेहता कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत आहेत.
वांद्रे पोलिसांनी एडीआर दाखल करून अनिल अरोरा (Anil Arora) पार्थिव शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या विलेपार्ले पश्चिमेकडे कुपर रुग्णालयात पाठविले आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अरोरा कुटुंबीयातील सदस्य आणि प्रत्यक्षदर्शी यांचे जवाब नोंदवायचा काम सुरू केले आहे. याचदरम्यान मलायका अरोराच्या आईने नेमकं काय घडलं, याबाबत माहिती दिली आहे. मलायका अरोराची आई जॉयस पॉलीकार्प यांनी सांगितले की, अनिल अरोरा यांना रोज सकाळी बाल्कनीत बसून वर्तमानपत्र वाचण्याची सवय होती. सकाळी मी अनिलच्या खोलीत फक्त चप्पल पाहिली. त्यानंतर मी बाल्कनीत त्याला पाहायला गेली. पण अनिल तेथे दिसला नाही. त्यानंतर बाल्कनीतून मी खाली वाकून पाहिलं, तर वॉचमन मदतीसाठी ओरडत असल्याचं दिसलं, असं अनिल अरोरा यांच्या आईने सांगितलं.
सहाव्या मजल्यावरुन उडी मारण्याआधी मुलींना फोन-
अनिल अरोरा यांनी आत्महत्या करण्याआधी त्यांच्या दोन्ही मुलींसोबत संवाद साधला होता. त्यांनी मलायका आणि अमृता या दोघींना फोन करुन मी आजारी असून खूप थकलो असल्याचं म्हटलं होतं. अनिल अरोरा आणि त्यांची पत्नी वांद्रे पश्चिमेकडील आयेशा मनोर या इमारतीत मागील अनेक वर्षापासून राहत आहेत.
अनिल अरोरा मर्चंट नेव्हीत होते कामाला-
मलायका अरोराची आई जॉयस पॉलीकॉर्प या मल्याळी ख्रिश्चन आहेत. तर, वडील अनिल अरोरा हे हिंदू पंजाबी होते. त्यांनी मर्चंट नेव्हीत काम केले. मलायकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचे आई-वडील वेगळे झाले तेव्हा ती फक्त 11 वर्षांची होती. 'माझं बालपण खूप छान होतं, पण ते सोपं नव्हतं. मागे वळून पाहताना, मला ते गोंधळात टाकणारे आढळले, परंतु कठीण प्रसंग देखील तुम्हाला महत्त्वाचे धडे शिकवतात, असे मलायकाने या मुलाखतीत म्हटले होते.
संबंधित बातमी:
वडील सहाव्या मजल्यावरुन ज्या ठिकाणी कोसळले, तेथेच लेक थांबली; अमृता अरोरा ढसाढसा रडली, Photo's
चित्रपटात जास्त काम न करताही कोट्यवधींची कमाई; मलायका अरोराची संपत्ती किती?