(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Makarand Deshpande : मोठ्या पडद्यावर मनोज जरांगे साकारण्याचं आव्हान ते भूमिकेचं देणं, मकरंद देशपाडेंनी सांगितला प्रवास
Makarand Deshpande : मनोज जरांगे यांची भूमिका कशी साकारली याविषयी मकरंद देशपांडे यांनी एबीपी माझासोबत संवाद साधला.
Makarand Deshpande : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सुरु केलेला लढा आता पुन्हा एकदा सुरु झाला आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरु केलं. पण गुरुवार 13 जून रोजी सरकारकडून शंभुराज देसाई आणि नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगेंची भेट घेऊन सरकारसाठी काही वेळ मागितला. सरकारला एक महिन्याचा अवधी देत मनोज जरांगे यांनी त्यांचं उपोषण सध्या तरी स्थगित केलंय. पण या सगळ्यात मोठ्या पडद्यावर येणाऱ्या 'आम्ही जरांगे' या सिनेमाची देखील प्रत्येकाला उत्सुकता लागून राहिली आहे. मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) यांनी या सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका साकारलीये. याविषयी त्यांनी एबीपी माझासोबत संवाद साधला
मकरंद देशपांडे हे या सिनेमात मनोज जरांगेंच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्या या भूमिकेची देखील सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हा सिनेमा आता 21 जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पण ही भूमिका साकारताना मकरंद देशपांडे यांना आलेली आव्हानं आणि या भूमिकेनी दिलेलं देणं याविषयी त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं.
मनोज जरांगे कसे साकारले?
या भूमिकेविषयी बोलताना मकरंद देशपांडे यांनी म्हटलं की, जरांगे हे प्रत्येकाच्या मनात आहेतच, पण ते चेहऱ्यावर दिसणं हे श्रेय दिग्दर्शक, लेखक यांचं आहे. काही व्यक्तिमत्त्व ही स्वत: अनपौचारिकपणे तुमच्यावर गारुड घालत असतात, तुमच्यावर ती छाप पाडत असतात आणि ते करताना मला जास्त जाणवलं. जरांगेंप्रमाणाचे त्यांचे डोळेही खूप बोलतात. त्यांच्या बोलण्याचंही थोडं टेन्शन होतं, कारण योगेशचं असं झालं की, जरांगे खूप पटापट बोलतात आणि सर खूप हळू हळू बोलतात. पण नटाचं ते काम आहे. आम्ही परभणीला शूट केलं पण तिथल्या लोकांचा प्रतिसाद अफलातून होता. लोकं फक्त बघण्यासाठी गर्दी होत होती. त्या लोकांना बघूनच आपण काय करतोय याची जाणीव झाली.
मनोज जरांगेंच्या भूमिकेने काय दिलं?
या भूमिकेने काय दिलं याविषयी बोलताना मकरंद देशपांडेंनी म्हटलं की, या भूमिकेने साधेपणा दिला. कारण परिपक्वता ही साधेपणात असते. एखाद्या साध्या माणसाची भूमिका साकारताना ती साधेपणानेच करायची असते. ती भूमिका मी करतोय की जगतोय यामध्ये फार काही अंतर नव्हतं. ते साधे राहून असाधरण जगातायत, हे मी माझ्यासोबत कायमच ठेवन.
ही बातमी वाचा :
Shashank Ketkar : हा सगळा कचरा उचलून बीएमसी ऑफिससमोर...; शशांक केतकरने व्यक्त केला संताप