Serial Special Episode : सिम्मीकाकू नेहाला सुनावणार, तर सिद्धार्थचा खोटेपणा सर्वांसमोर येणार! एक तासांचे विशेष भाग!
Marathi Serial Update : 'माझी तुझी रेशीमगाठ' आणि 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या दोन्ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचल्या आहेत आणि मालिकेत आता पुढे काय घडणार याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
Marathi Serial Special Episode : येत्या रविवारी म्हणजेच 6 फेब्रुवारीला झी मराठीवर 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) आणि 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' (Tujhya Majhya Sansarala Aani Kay Hava) या दोन मालिकांचे महाएपिसोड प्रसारित केले जाणार आहेत. दोन्ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचल्या आहेत आणि मालिकेत आता पुढे काय घडणार याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
सिम्मीकाकू नेहाला सुनावणार!
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत यशच्या अपघातानंतर नेहा यशला भेटण्यासाठी त्याच्या घरी जाते. पण, सिम्मी काकू तिला तिच्या गरीबीवरुन सुनावते आणि यशपासून लांब राहा सांगते. दुखावलेली नेहा यशला शंभर रुपयात दिवस काढायचं चॅलेंज देते. नेहाला जाणीव होते की, कदाचित यशच्या बाबतीत आपण अतिरेक केला. पण घडलेल्या घटनांमुळे यश निर्णय घेतो की, यापुढे नेहाला जबरदस्ती प्रेमाचा स्वीकार करायला लावायचा नाही. मैत्रीचा हात पुढे करण्यासाठी आलेल्या नेहाच्या हातात यश मात्र रिलिविंग लेटर देऊन सांगतो की, पुढच्या चार दिवसांत ती नोकरी सोडून जाऊ शकते. यश नेहाच्या नात्यातलं हे रंजक वळण या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. काय असेल यापुढे नेहाचा निर्णय, हे येत्या आठवड्यात प्रेक्षकांना कळेल.
सिद्धार्थचा खोटेपणा सर्वांसमोर येणार!
'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेत सध्या अदिती आणि सिद्धार्थच्या संसाराच्या गाडीला सिद्धार्थच्या अमेरिकेच्या हट्टाने धक्का बसलाय. गोड गुलाबी संसाराच्या स्वप्नांमध्ये रमलेल्या अदितीला सिद्धार्थ खोटेपणाचा आधार घेऊन अमेरिकेला घेऊन जाण्याची स्वप्न रंगवतोय. एकीकडे अदिती हनीमूनला जाण्याची तयारी करतेय, तर सिद्धू अमेरिकेल्या जाण्याची. रविवारच्या विशेष भागात सिद्धार्थचा खोटेपणा अदितीसमोर येणार आहे. सिद्धार्थच्या खोटेपणाने दुखावलेली अदिती सिद्धार्थसोबत अमेरिकेला जाणार की, कुटुंबाची साथ देणार? अदिती समोरचा हा पेच तिला कुठे घेऊन जाणार, हे पाहाणं निश्चितच रंजक ठरणार आहे.
त्यामुळे या मालिकांमध्ये पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक देखील आता उत्सुक आहेत. रविवारच्या एक तास विशेष भागांत प्रेक्षकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Parineeti Chopra, Arjun Kapoor : 'तुझा आवाज...', अर्जुननं केलं ट्रोल, परिणीतीनं दिली रिअॅक्शन
- Arjun Kapoor : ' ती मला पाहतेय'; अर्जुनला येते आईची आठवण
- MS Dhoni Novel Atharva The Origin : धोनीची नवी इनिंग; ग्राफिक नॉवेलचा फर्स्ट लूक रिलीज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha