एक्स्प्लोर

Maithili Thakur Net Worth: अवघ्या 25व्या वर्षी जगातील सर्वात मोठ्या पक्षाचं तिकीट मिळवलं, बिहारच्या निवडणुकीत नशीब आजमावणारी मैथिली ठाकूर कोट्यवधींची मालकीण, नेटवर्थ किती?

Maithili Thakur Net Worth: बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. मैथिली बिहारमधील दरभंगा जिल्ह्याच्या अलीनगर विधानसभेतून रिंगणात उतरली आहे.

Maithili Thakur Net Worth: बिहारमधील (Bihar Election) मधुबनी जिल्ह्यातील मातीतून उठलेला एक आवाज केवळ देशभरातच नाही तर जगभरात गुंजतोय. तिचं नाव मैथिली ठाकूर (Maithili Thakur). फक्त 25 वर्षाची असलेल्या या तरुणीनं आपल्या गोड आवाजानं लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत. पण, सध्या ती चर्चेत आहे, एका वेगळ्याच कारणामुळे. मैथिली ठाकूर सध्या बिहार विधानसभेच्या (Bihar Vidhansabha Election) रणांगणात उतरली आहे. 

बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. मैथिली बिहारमधील दरभंगा जिल्ह्याच्या अलीनगर विधानसभेतून रिंगणात उतरली आहे. तसेच, मैथिली भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे.  फक्त एका लाईव्ह परफॉर्मन्सनं लाखो लोकांपर्यंत पोहोचणारी मैथिली दरमहा किती कमावते तुम्हाला ठाऊक आहे का? निवडणुकीचा अर्ज दाखल करताना मैथिलीनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात तिनं आपली संपत्ती जाहीर केलीय. प्रतिज्ञापत्रानुसार, पंचवीस वर्षाची मैथिली कोट्यवधींची मालकीण आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Maithili R Thakur (@maithilithakur)

मैथिली एका लाईव्ह परफॉर्मन्स लाखो रुपये घेते. याशिवाय, ती तिच्या यूट्यूब चॅनल आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमधून भरघोस उत्पन्न मिळवते. मैथिली सध्या भाजपच्या तिकिटावर बिहारमधील अलीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतेय.

लहानपणापासूनच लागली संगीताची गोडी (Loved Music Since Childhood)

मैथिली ठाकूरचा जन्म बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी इथे झाला. तिचे वडील रमेश ठाकूर हे स्वतः संगीत शिक्षक आहेत आणि त्यांनी तिला लहानपणापासूनच लोक संगीत आणि शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण दिलं. घरातील वातावरण संगीतमय होतं, त्यामुळे लहानपणापासूनच तिला संगीताची गोडी लागली. तिचे दोन भाऊ, ऋषव आणि अयाची, तबला आणि हार्मोनियम वाजवतात. आधी ही तिनही भावंड एकत्र आपल्या राहत्या घरीच व्हिडीओ रेकॉर्ड करुन तो यूट्यूबवर अपलोड करायचे. हळूहळू, या भावंडांच्या व्हिडीओंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आणि मैथिली ठाकूर आणि तिच्या भावंडाचं नाव घराघरात पोहोचलं.

एका टेलिव्हिजन शोमधून ओळख मिळाली (Got Recognition From  Television Show)

2017 मध्ये कलर्स चॅनलच्या 'रायझिंग स्टार'मध्ये दिसल्यानंतर मैथिली ठाकूरला देशभरात ओळख मिळाली. या शोनं तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आपलं गाणं सादर करण्याची संधी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला राष्ट्रीय निर्माते पुरस्कारानंही सन्मानित केलेलं.

लोकसंगीताची ओळख

मैथिलीनं मैथिली, भोजपुरी आणि हिंदी गाण्यांना एका नव्या स्वरुपात सर्वांसमोर सादर केलं आणि तरुणांना लोकसंगीताशी जोडलं आहे. तिच्या आवाजात पारंपारिक गोडवा आहे, तरीही तिची शैली पूर्णपणे आधुनिक आहे. म्हणूनच तिच्या व्हिडीओंना YouTube वर लाखो व्ह्यूज मिळतात.

मैथिली एका महिन्याला किती कमावते? (How Much Does Maithili Earn In Month?)

मैथिली एका शोसाठी 5 ते 7 लाख रुपये घेते. ती महिन्याला सुमारे 10-12 शो करते. ती तिच्या यूट्यूब चॅनेलद्वारे देखील कमाई करते. तिचं अंदाजे मासिक उत्पन्न 50 लाख ते 90 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. तिच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात तिनं तिची तब्बल 1.5 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता, 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि वाहनं असल्याचं जाहीर केलं आहे. तिनं असंही म्हटलंय की, तिच्याकडे 1.80 लाख रुपयांची रोख रक्कम आहे.

आता राजकारणात एक नवी इनिंग (Maithili New Innings In Politics)

अलिकडेच, मैथिली ठाकूर भाजपमध्ये सामील झाली आणि तिला दरभंगाच्या अलीनगर मतदारसंघातून तिकीट देण्यात आलंय. राजकारणात प्रवेश करूनही ती म्हणते की, संगीत तिची खरी ओळख राहील. मैथिली सांगताना सांगते की, "संगीत माझ्यासाठी आयुष्यासारखं आहे. मी जे काही कमावते, ते माझ्या कुटुंबाच्या वर्षानुवर्ष केलेल्या मेहनतीचे परिणाम आहेत..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maithili Thakur Controversy: ब्लू प्रिंटचा प्रश्न, मैथिली ठाकूरला वाटलं फिल्म, म्हणाली, 'कॅमेऱ्यावर कसं सांगू, ती वैयक्तिक बाब'

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Embed widget