Vanita Kharat Joined Students Protest: हातात संविधान अन्...; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर विद्यार्थ्यांसोबत उतरल्या रस्त्यावर, PHOTOs
Vanita Kharat Joined Students Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात आणि अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर दोघी मुंबईतील दादर शिवाजी पार्क इथल्या आंदोलनात सहभागी झालेल्या.

Vanita Kharat Joined Students Protest: सध्या देशभरातली विद्यार्थी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा (Union Education Minister Dharmendra Pradhan) मागण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यासाठी कारण ठरलंय, नीट पेपरफुटी प्रकरण (NEET Paper Leak Case) आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या. नीट पेपर फुटीविरुद्ध कॉकरोच जनता पार्टीने (Cockroach Janata Party) आवाज उठवला आणि देशभरातली विद्यार्थ्यांना साद घातली. या आंदोलनता मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी झाले. बॉलिवूड सेलिब्रिटींपासून (Bollywood Celebrity) राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकांनी या आंदोलनाला समर्थन दिलंय. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) फेम वनिता खरात (Vanita Kharat) आणि अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर दोघी आंदोलनात सहभागी झालेल्या. मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथील आंदोलनात वनिता खरात आणि प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) यांनी हजेरी लावलेली. याचे फोटो वनिता खरातनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तर, त्यासोबतच तिनं एक पोस्ट लिहिलीय, जी जोरदार चर्चेत आहे.
वनिता खरातची सोशल मिडिया पोस्ट (Vanita Kharat Post On Students Protest)
मराठी अभिनेत्री वनिता खरात हिनं सोशल मीडियावर आंदोलनाचे फोटो शेअर करुन लिहिलंय की, "जय भारत!, जय संविधान! काल NEET प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात सहभागी झाले. आपण जिथे असू, तिथून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. कारण आज प्रश्न फक्त एका परीक्षेचा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा, मेहनतीचा आणि आपल्या देशाच्या भविष्याचा आहे. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही, तो प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. आपल्या संविधानाने आपल्याला तो अधिकार दिला आहे..."
View this post on Instagram
वनिता खरात नेमकं काय म्हणाली?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम मराठी अभिनेत्री वनिता खरात हिनं लिहिलंय की, "विद्यार्थ्यांचा आवाज दाबून भविष्य घडत नाही, त्यांचा आवाज ऐकून राष्ट्र घडतं... आवाज द्या. प्रश्न विचारा. न्यायाची साथ द्या..." वनिता खरातची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. वनिताच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातोय. तर, वनिता खरातनं पोस्ट करायच्या आधी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेते समीर चौघुले यांनीही एक पोस्ट करुन विद्यार्थी आंदोलनाला पाठींबा दर्शवला होता.
समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट
मराठी अभिनेते समीर चौघुले यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली असून ते म्हणालेत की, "आता एकाची पोस्ट वाचली... "परीक्षेचा पेपर लीक झाला म्हणून आत्महत्या केलेल्या मुलांना असंच पाहिजे... जे स्वतःचा जीव नाही वाचवू शकत, ते डॉक्टर होऊन उद्या लोकांचे जीव काय वाचवणार"... सुन्न झालो... आपण माणसे नाही राहिलो... झोंबी झालो आहोत... हा कोणता 'उन्माद' भरलाय आपल्या सर्वांच्या डोक्यात..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















