आधी हक्काचं घर....आता नवी कोरी कार..महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील 'या' कलाकाराचं आणखी एक स्वप्न पूर्ण!
Prithvik Pratap : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधील इतर कलाकार प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव यानंतर आता या कलाकारानेही आपलं स्वप्न पूर्ण करून दाखवलं आहे.
Prithvik Pratap : ते म्हणतात ना, मेहनतीला नशीबाची जोड मिळाली की आपली सर्व स्वप्न एका मागोमाग एक पूर्ण व्हायला लागतात. तसं पाहायला गेलं तर घर आणि गाडी हे कोणत्याही सामान्य माणसांचं सर्वात पहिलं स्वप्न असतं. आणि ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी माणून तितकीच मेहनतही करतो. कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रामधील (Maharashtrachi Hasyajatra) एका कलाकाराने देखील आपलं आणखी एक स्वप्न पूर्ण केलंय. आधी घर.... आता नवी कोरी कार या कलाकाराने घेत आपल्या स्वप्नांची पूर्तता केलीय. त्या कलाकाराचं नाव पृथ्वीक प्रताप आहे. याच शोमधील कलाकार प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव यानंतर आता पृथ्वीकने आपलं स्वप्न पूर्ण करून दाखवलं आहे.
आधी आपलं हक्काचं घर.. त्यानंतर चार चाकी गाडीचं स्वप्न पूर्ण
सोनी मराठी वाहिनीवर येणारा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कॉमेडी शो हा अत्यंत लोकप्रिय असून अनेकांच्या घराघरात जाऊन पोहचला आहे. हा शो गेली सहा सात वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आणि याच शो मुळे कलाकारांनाही आर्थिक स्थैर्य मिळवून देत आहे. आधी आपलं हक्काचं घर.. त्यानंतर चार चाकी गाडीचं स्वप्न उराशी बाळगून या कलाकारांनी एकापाठोपाठ एक स्वप्नांची पूर्तता करून दाखवलं आहे. यापूर्वी याच शोच्या इतर कलाकारांनीही आपलं हक्काचं घर खरेदी केलेलं पाहायला मिळालं. आधी प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव यांनी त्यांच्या गावी फार्म हाऊस म्हणजेच शेतघर उभारल्याचं पाहायला मिळालं
या गाडीची किंमत साधारण 12 ते 18 लाख इतकी
आधी घर.. आता गाडी..असं एक एक करून पृथ्वीकही आपलं यशस्वी पाऊल पुढे टाकत आहे. पृथ्वीकने आपली पहिली गाडी खरेदी केल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पृथ्वीकने जी गाडी खरेदी केलीय, ती गाडी Kia santos आहे. या गाडीची किंमत साधारण 12 ते 18 लाख इतकी आहे. गाडी ताब्यात घेताना पृथ्वीक त्याच्या आईलाही घेऊन आला होता. पृथ्वीक म्हणतो, त्याच्या आईने अत्यंत कष्ट करून मेहनतीने त्याला लहानाचं मोठं केलंय. म्हणून आता सुखाचे दिवस तिच्या वाट्याला यावे आणि हक्काच्या घरात एक खास जागा आईसाठी असावी, अशी इच्छा पृथ्वीकने व्यक्त केली होती, ती देखील त्याने पूर्ण करून दाखवलीय, कारण पृथ्वीकने आईसाठी एक खास खुर्ची बनवून घेतली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रातून मिळाली मोठी संधी
छोट्या भूमिकेतून पुढे आलेल्या पृथ्वीकला महाराष्ट्राची हास्यजत्राने दिलेल्या मोठ्या संधीचं त्यानं सोनं केलंय. सामान्य कुटुंबातील पृथ्वीक प्रताप याने हे यश मिळवण्यासाठी मोठी मेहनतही घेतली आहे. गेली पाच सहा वर्षे मेहनत आणि विश्वासाच्या बळावर त्याने पृथ्वीक एकेक करून यशाची पायरी चढत आहे. आणि आणखी बराच पल्ला त्याला गाठायचा आहे, असं पृथ्वीक म्हणतो.
हेही वाचा :