एक्स्प्लोर

Gaurav More Marriage: हास्यजत्रेतील 'फिल्टर पाड्याचा बच्चन ' अडकला लग्नबंधनात! गौरव मोरेनं खऱ्या आयुष्यात पोरगी पटवलीच; चाहत्यांना सुखद धक्का

Gaurav More: गौरवने अत्यंत साध्या पद्धतीने आणि कोणालाही थांगपत्ता लागू न देता लग्न केल्याने त्याच्या चाहत्यांना चांगलंच सरप्राईज दिलंय.  

Maharashtrachi Hasyajatra Actor Gurav More Wedding: महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमधून घराघरात लोकप्रिय झालेला फिल्टर 'पाड्याचा बच्चन' गौरव मोरे ( Gaurav More) याने चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. गौरव मोरेने खऱ्या आयुष्यात लग्न  केलं असून अचानक समोर आलेल्या लग्नाच्या फोटोंनी चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. हास्यजत्रेत गौरवच्या  स्टाईलचं कायम कौतूक होतं. त्यातच्या वेगळ्या अंदाजामुळे तो प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहतो. आता कुठलाही गाजावाजा न करता आपल्या गर्लफ्रेंडसोबत  लग्न केलं असून अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने शेअर केलेल्या फोटोमुळे गौरवने लग्नगाठ बांधल्याचं समोर आले आहे. 'Mr & Mrs मोरे ' असं कॅप्शनही तिने या फोटोवर टाकलंय. त्यामुळे गौरवने लग्न केल्याचे कन्फर्म झालंय. गौरवने अत्यंत साध्या पद्धतीने आणि कोणालाही थांगपत्ता लागू न देता लग्न केल्याने त्याच्या चाहत्यांना चांगलंच सरप्राईज दिलंय.  

गौरव मोरेनं केलं 'या' अभिनेत्रीशी लग्न

'फिल्टर पाड्याचा बच्चन ' गौरव मोरे हास्यजत्रेत कित्येकदा मुलीचा हात मागायला जातो, अन् रिजेक्ट होऊन परत येतो. पण, खऱ्या आयुष्यात गौरवने त्याची गर्लफ्रेंड प्रियंका कारेकर हिच्यासोबत लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. विशेष म्हणजे गौरवने स्वतः अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत पोस्ट शेअर केलेली नाही. मात्र, त्याची जवळची मैत्रीण व मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने शेअर केलेल्या एका फोटोमुळे हा गौप्यस्फोट झाला आहे.


Gaurav More Marriage: हास्यजत्रेतील 'फिल्टर पाड्याचा बच्चन ' अडकला लग्नबंधनात! गौरव मोरेनं खऱ्या आयुष्यात पोरगी पटवलीच; चाहत्यांना सुखद धक्का

या फोटोमध्ये गौरवची बायको साडी हातात चुडा, गळ्यात मंगळसूत्र अशा वेषात दिसतेय. गौरव तिच्या बाजूला उभारलाय. ऋतुजाने या दोघांसोबत फोटो काढत तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "मिस्टर अँड मिसेस मोरे, तुमच्या या नवीन प्रवासासाठी आणि सुंदर नवीन घरासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन! 'करू' आणि 'बच्ची', गॉड ब्लेस यू." गौरवने फक्त लग्नच नाही, तर आपल्या हक्काच्या नव्या घरात गृहप्रवेशही केलाय. एकाच वेळी दोन मोठे सरप्राईज मिळाल्याने गौरववर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka karekar (@karekarpriyanka)

दरम्यान, गौरव मोरेची पत्नी प्रियंकाही मनोरंजन विश्वातीलच असल्याचं  तिच्या सोशल मीडियावरून कळतंय. तिने काही नाटक आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. इतकच नाही तर अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि प्रियंका या खूप जुन्या आणि घट्ट मैत्रिणी आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget