Madhuri Dixit : माधुरी दीक्षित म्हणाली ‘तो’ किस कट कर; निर्माता म्हणाला, तुला त्यासाठी एक कोटी पूर्वीच दिलेत अजिबात करणार नाही!
Madhuri Dixit : अत्यंत हॉट किसिंग सीननंतर माधुरी दीक्षितवर सडकून टीका झाली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर माधुरीला टीकाकारांना सामोरे जावे लागले. त्यामुळे नोटीस पाठवून सीन हटवण्यास सांगितले.

Madhuri Dixit : बॉलीवूड चित्रपटांमध्ये जेव्हा जेव्हा बोल्ड सीन्सचा उल्लेख होतो तेव्हा माधुरी दीक्षित (vinod khanna and madhuri dixit) आणि विनोद खन्ना यांच्या 'दयावान' चित्रपटाचे नाव आपोआप प्रत्येकाच्या मनात येते. 1988 मध्ये आलेल्या या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्यामध्ये अत्यंत हॉट सीन्स चित्रित करण्यात आले होते. तसे, त्या काळात बहुतेक अभिनेत्री विनोद खन्नासोबत इंटिमेट सीन करायला घाबरत असत. चुंबन घेताना विनोद खन्ना यांचा संयम सुटत असे. त्यामुळे अनेक अभिनेत्री दचकून असत.
View this post on Instagram
'आज फिर तुमपे प्यार आया है' हिट साँग
'दयावान' चित्रपटातील 'आज फिर तुमपे प्यार आया है' हे गाणे त्या काळात खूप हिट ठरले होते. याचे एक मोठे कारण म्हणजे या गाण्यात दिलेले माधुरी आणि विनोद खन्ना यांच्यातील हॉट सीन्स. फिरोज खान यांच्या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्यात किसिंग सीन शूट होत असताना माधुरीला पाहताच विनोद खन्ना यांचे चांगलेच भान हरपले होते.
एक कोटी रुपये दिल्याचे सांगत निर्मात्यानं मागणी धुडकावली
'दयावान'मधील अत्यंत हॉट किसिंग सीननंतर माधुरी दीक्षितवर सडकून टीका झाली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर माधुरीला अनेक टीकाकारांना सामोरे जावे लागले. त्यामुळे माधुरीने नोटीस पाठवून सीन हटवण्यास सांगितले. मात्र, पक्के व्यावसायिक असलेल्या फिरोज खान यांनी माधुरीची मागणी धुडकावून लावत स्पष्ट नकार दिला. फिरोज खान यांनी माधुरीला सीनसाठी एक कोटी रुपये दिल्याचे सांगत किसिंग सीन आहे तसाच ठेवला.
View this post on Instagram
सीन चित्रित करताना माधुरीकडून कोणतीही तक्रार होऊ नये यासाठी फिरोज खान यांनी एक कोटी रुपये दिले होते. त्यामुळे पैसे वसूल करण्याची जबाबदारी फिरोज खान यांच्यावर होती. चित्रपटाच्या कहाणीमध्ये दम नसल्याने त्यांचा भर किसिंस सर्वांत लांब कसा होईल याकडे लक्ष होते आणि रणनीती तशीच अवलंबली होती.
View this post on Instagram
तब्बल 20 वर्षांनी मोठा असणाऱ्या विनोद खन्ना आणि माधुरीच्या सीन्सची बरीच चर्चा झाली. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी याच सीन्सचा पुरेपूर वापर झाला. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला. माधुरीच्या नोटिशीने फिरोज खान यांनी अजिबात पाय मागे घेतला नाही. त्यानंतर माधुरी तो सीन म्हणजे एक चूक असल्याचे सांगू लागली. मात्र, या चित्रपटानंतर फिरोज खान आणि माधुरी दोघांनाही चांगलाच फायदा झाला तो भाग वेगळा.
इतर महत्वाच्या बातम्या























