Madhuri Dixit Intimate Scene: माधुरीसोबत इंटीमेट सीन, देहभान विसरला सुपरस्टार; दिग्दर्शक थांब-थांब म्हणाले, पण, त्यानं जबरदस्तीनं किस करताना ओठ चावले
Madhuri Dixit Intimate Scene: विनोद खन्ना आणि माधुरी यांच्यात 21 वर्षांचा फरक. चित्रपटात दोघांमध्ये एक किसिंग सीन दाखवण्यात आलेला.

Madhuri Dixit Intimate Scene: बॉलिवूड चित्रपटांमध्ये (Bollywood Movie) आता इंटिमेट सीन्स खूप सामान्य आहेत. अगदी कोणत्याही चित्रपटात किसिंग सीन तर असतोच असतो... पण पूर्वीच्या काळात एखाद्या चित्रपटात इंटिमेट सीन्स असणं ही फार मोठी गोष्ट होती. इंटिमेट सीन म्हणजे, सिनेमा ब्लॉकबस्टर करण्याची चावीच, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. असाच एक सिनेमा 1988 मध्ये प्रदर्शित झालेला, ज्यामध्ये अभिनेता इंटिमेट सीन करताना स्वतःचं देहभान विसरलेला. बरं त्याला इंटिमेट सीन करायचा होता, धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत (Madhuri Dixit). समोर जरी माधुरी असली तरीसुद्धा अभिनेता साधासुधा नव्हता. 80-90 चं दशक गाजवणारा सुपरस्टार होता.
आम्ही ज्या सिनेमाबाबत तुम्हाला सांगतोय, त्या सिनेमाचं नाव 'दयावान'. या सिनेमात माधुरी दीक्षितसोबत सुपरस्टार विनोद खन्ना (Vinod Khanna) मुख्य भूमिकेत होते. त्यावेळी माधुरी विनोद खन्नांपेक्षा 21 वर्षांनी लहान होती. बरं माधुरीनं नुकतंच सिनेसृष्टीत पाऊल ठेवलेलं... त्या काळात 21 वर्षांनी लहान माधुरीसोबत विनोद खन्नांना रोमान्स करताना पाहणं प्रेक्षकांसाठीही आश्चर्यकारकच होतं.
दयावान 1988 मध्ये प्रदर्शित झाला. त्यावेळी चित्रपटात इंटिमेट सीन्स दाखवणं बोल्ड मानलं जायचं, तर विनोद खन्ना आणि माधुरी यांच्यात 21 वर्षांचा फरक. चित्रपटात दोघांमध्ये एक किसिंग सीन दाखवण्यात आलेला. त्यावेळी माधुरी 21 वर्षांची होती आणि तिची कारकीर्द नुकतीच सुरू झालेली. विनोद खन्ना सुपरस्टार होते.
View this post on Instagram
देहभान विसरलेले विनोद खन्ना
'दयावान' सिनेमातलं गाण 'आज फिर तुमपे प्यारा आया है...', हे खूप व्हायरल झालेलं. याच गाण्यात माधुरी आणि विनोद खन्नांचा किसिंग सीन होता. पण, सीन शूट करताना विनोद खन्ना देहभान विसरले आणि दिग्दर्शकांनी कट म्हटल्यानंतरही माधुरीचे ओठ चघळत राहिले. विनोद खन्नांना दिग्दर्शकांना थांबण्यास सांगितलं, पण तरीसुद्धा ते माधुरीला जबरदस्तीनं किस करतच होते.
मिडिया रिपोर्ट्सनुसार, विनोद खन्नांनी माधुरीला जबरदस्तीनं किस करताना तिचे ओठ चावलेले. माधुरी फारच भेदरली. ती तिथेच ढसाढसा रडू लागली. तिच्या ओठांमधून रक्तही येत होतं.
विनोद खन्नांनी मागितली माफी
विनोद खन्ना यांना त्यांची चूक लक्षात आल्यावर ते माधुरीकडे गेले आणि त्यांनी तिची माफी मागितली. त्या काळात विनोद खन्नांचे वडील त्यांचे रोमँटिक सीन्स पाहून थक्क झाले. ते 'दयावान'च्या प्रिमियरला उपस्थित होते. त्यांच्या मुलानं ऑन स्क्रिन सर्व मर्यादा ओलांडल्याचं पाहून त्यांना जबर धक्का बसला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























