Lok Sabha Result 2024 :'ड्रीम गर्ल'च्या विजयाच्या 'ड्रीम' हॅट्रीकचं स्वप्न पूर्ण, हेमा मालिनींनी जिंकली मथुरेची मनं
Lok Sabha Result 2024 : बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी या मथुरेतून लोकसभेच्या रिंगणात होत्या. दरम्यान यंदा देखील त्यांचा विजय असल्याचं पाहायला मिळालं आहे.
Lok Sabha Result 2024 : बॉलीवूडमध्ये प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणाऱ्या हेमा मालिनी (Hema Malini) या राजकारणाच्या मैदानात जनतेची देखील मनं जिंकत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच यंदा त्यांना श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या मथुरेतून उमेदवारी देण्यात आली होती. याआधी देखील हेमा मालिनी जवळपास दोन टर्म खासदार म्हणून निवडून आलेल्या हेमा मालिनी सध्या तिसऱ्यांदा खासदार होणार असल्याच्या वाटेवर होत्या. पण आता तो कल समोर आला असून हेमा मालिनी यांनी मथुरेतून विजय मिळवला आहे. कारण आतापर्यंत समोर आलेल्या कलांनुसार, हेमा मालिनी या मथुरेत जवळपास 2 लाख मतांनी आघाडीवर होत्या.
दरम्यान यानंतर हेमा मालिनी यांनी एएनआय वृत्तसंस्थेसोबत बातचीत करताना म्हटलं की, श्रीकृष्णच्या कृपेने आम्ही विजयाच्या वाटेवर आहोत. प्रचारादरम्यान मी मथुरा, वृंदावन इथल्या लोकांना जी काही वचनं दिली होती, ती पूर्ण करणार आहे. तसेच इथल्या विकासासाठीही मला बरीटच काम करायची आहेत.
2014 मध्ये केली विजयाची नांदी
दरम्यान हेमा मालिनी यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्याच वर्षी त्यांनी त्यांच्या विजयाची नांदी देखील केली. त्यावेळी त्यांच्या विरोधात जयन्त चौधरी आणि पंडित योगेश कुमार द्विवेदी देखील होते. पण त्यावेळी देखील त्यांचा विजय झाला आणि त्यांनी देशाच्या संसदेत प्रवेश केला.
2019 मध्येही विजयाचा धुरळा
दरम्यान हेमा मालिनी यांनी त्यांच्या विजयाची रॅली सुरुच ठेवली. 2019 मध्ये हेमा मालिनी यांना भाजपकडूनच मैदानात उतरल्या होत्या. त्यावेळी त्यांनी 6,71,293 मतं मिळवत दुसऱ्यांदा खासदार म्हणून देशाच्या संसदेची पायरी चढली होती. त्यावेळी त्यांच्याविरोधात एकूण 12 उमेदवार मैदानात होते. काँग्रेसने महेश पाठक, राष्ट्रीय लोकदलाने कुंवर नरेंद्र सिंह, स्वतंत्र जनता पक्षाने ओम प्रकाश यांना उमेदवारी दिली होती.
बॉलीवूडची लाडकी अभिनेत्री हेमा मालिनी या श्रीकृष्णाच्या जन्मभूमीतून म्हणजेच मथुरेतून लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. मागील दोन टर्म खासदार राहिलेल्या हेमा मालिनी त्यांच्या विजयाची हॅट्रीक पूर्ण करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. त्यातच यंदा त्यांच्यासमोर काँग्रेस-सपा आघाडीचे उमेदवार मुकेश धनगर यांचं तगडं आव्हान आहे.