एक्स्प्लोर

कळशीचा छावा अन् साखरगावची सुंदरी; 14 ऑक्टोबरपासून कलर्स मराठी'वर पाहायला मिळणार रांगडी प्रेमकथा

महाराष्ट्राच्या लाडक्या 'कलर्स मराठी' (Colors Marathi) वाहिनीवरील 'लय आवडतेस तू मला' (Lay Avadtes Tu Mala ) ही मालिका पाहताना प्रेक्षक बेभान होणार आहेत.

Lay Avadtes Tu Mala : महाराष्ट्राच्या लाडक्या 'कलर्स मराठी' (Colors Marathi) वाहिनीवरील 'लय आवडतेस तू मला' (Lay Avadtes Tu Mala ) ही मालिका पाहताना प्रेक्षक बेभान होणार आहेत. तमाम महाराष्ट्रावर निराळी जादू करायला ही नवी मालिका सज्ज आहे. प्रेक्षकांच्या काळजाला हात घालण्यात मालिका यशस्वी ठरेल. एका सरळ रेषेत चालणाऱ्या आयुष्याचं, समाजाचं, हाडा-मासाच्या लोकांचं, त्यांच्या प्रेमाचं सत्य मांडणारी ही मालिका आहे. सानिका आणि सरकार या दोन पात्रांसह त्यांच्या गावांभोवती फिरणारी ही मालिका आहे. 

काही दिवसांपूर्वीच लय आवडतेस तू मला या मालिकेची पहिली झलक समोर आली असून प्रेक्षकांना आता मालिकेची उत्सुकता आहे. सानिका मोजर आणि तन्मय जक्का हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. महाराष्ट्रात आता फक्त एकच आवाज घुमणार 'लय आवडतेस तू मला!'. येतेय नवी गोष्ट 'लय आवडतेस तू मला'. ही मालिका 14 ऑक्टोबरपासून रात्री 9:30 वा. आपल्या 'कलर्स मराठी'वर पाहता येणार आहे.

प्रेमाला असतो दोघांच्या गावांचा विरोध

सानिका आणि सरकार या दोन एकमेकांवर प्रेम करणाऱ्या पात्रांभोवती फिरणारी 'लय आवडतेस तू मला!' ही मालिका आहे. दोन प्रेम करणाऱ्यांच्या कुटुंबांना त्यांचं प्रेम मान्य नाही अशा अनेक प्रेमकथा आजवर आपण पाहिल्या आहेत. पण साखरगावची अल्लड सानिका आणि कळशी गावचा रांगडा सरकार यांच्या प्रेमकथेला तर त्या दोघांच्या गावांचाच विरोध आहे. कारण या गावांमध्ये आहे पिढीजात वैर... जे एकमेकांचा जीव घ्यायलाही मागेपुढे बघत नाही, अशा वातावरणात बहरणार का सानिका आणि सरकारचं अल्लड प्रेम? शत्रूत्वाच्या आगीत फुलणाऱ्या ही आगळीवेगळी प्रेमकथा उलगडणारी गोष्ट म्हणजे '#लय आवडतेस तू मला'. छोट्या पडद्यावरील प्रेम कथेची चौकट मोडण्याचा धाडसी प्रयत्न 'लय आवडतेस तू मला' या मालिकेत करण्यात आला आहे. आता छोट्या पडद्यावर प्रेम आणि शत्रूत्वाचा रंजक खेळ रंगणार आहे. गावाकडच्या गुलाबी प्रेमाची थरारक प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तरुण वर्गासह सर्वांनाच आकर्षित करणारी ही मालिका आहे. थरार, नाट्य, रोमान्स अन् बरचं काही प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल. 

अभिनेते किरण माने सरकारच्या वडिलांची भूमिकेत

'लय आवडतेस तू मला' मालिकेतील सानिका खूपच निरागस, भावूक, जिद्दी आणि प्रेमळ आहे. तर सरकार तिच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. तो गावचा छावा आहे. अत्यंत रावडी त्याचं व्यक्तिमत्त्व आहे. एका वेगळ्याच संघर्षातून फुलणारं प्रेम प्रेक्षकांना या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकेत सानिकाचे वडील साहेबराव पाटील यांच्या भूमिकेत संजय खापरे आहेत. साहेबराव पाटील हे साखरगावच्या साखरकारखान्याचे मालक आहेत. तर सरकारचे वडील हे साखरकारखान्यातील कामगारांचे यूनियन लिडर आहेत. अभिनेते किरण माने या मालिकेत सरकारच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत.  

मालिकेतील अनेक गोष्टींची प्रेक्षकांना भूरळ पाडणार

'लय आवडतेस तू मला' मालिकेबद्दल बोलताना प्रोग्रामिंग हेड, कलर्स मराठी, (वायकॉम18) - केदार शिंदे म्हणाले,"कलर्स मराठी' वाहिनीवर सध्या वेगवेगळे प्रयोग होत आहेत. 'लय आवडतेस तू मला' ही मालिकादेखील याचाच एक भाग आहे. प्रेक्षकांनी आजवर अनेक प्रेम कथा पाहिल्या असतील. पण ही झन्नाट लव्हस्टोरी मात्र यासगळ्यापेक्षा वेगळी आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही मालिका आहे. फ्रेश जोडी, रांगडी कथा, गावरान बाज अशा मालिकेतील अनेक गोष्टींची प्रेक्षकांना नक्कीच भूरळ पडेल".

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
Bharat Jadhav Webseries: भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
Embed widget