एक्स्प्लोर

Last Stop Khanda: प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट... 'लास्ट स्टॉप खांदा'चा टीजर रिलीज, कधी प्रदर्शित होणार सिनेमा?

Last Stop Khanda: 'लास्ट स्टॉप खांदा' हा संगीतमय चित्रपट 21 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर लॉन्च करण्यात आला. 

Last Stop Khanda: आयुष्याचा प्रवास सुरु झाला की, प्रत्येकाला प्रेमाच्या स्टॉपवर थांबावंसं वाटतंच , काहीजणं थांबतात , काहीजणं रमतात , काहीजणं भेटतात . प्रवास पुढे चालू राहतो पण त्या स्टॉप वरचं रेंगाळण मनात साठून राहतंच. अशीच प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट असलेला 'लास्ट स्टॉप खांदा' (Last Stop Khanda) हा संगीतमय चित्रपट 21 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर लॉन्च करण्यात आला. 

शिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स, स्नेहा प्रॉडक्शन्स यांनी 'लास्ट स्टॉप खांदा...' प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. प्रदीप मनोहर जाधव हे या चित्रपटाचे निर्माते असून सचिन कदम, अमृता सचिन जाधव सहनिर्माते आहेत. श्रमेश बेटकर लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन विनित परुळेकर यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेता श्रमेश बेटकर अभिनेत्री जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश कापरेकर, प्रियांका हांडे, डॉ. सचिन वामनराव, गणेश गुरव, निशांत जाधव, गिरीश तेंडुलकर, जयश्री गोविंद अशी तगडी स्टारकास्ट आहे. तर पाहुणे कलाकार म्हणून प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर, अशोक ढगे हे आपल्या भेटीस येणार आहेत. चित्रपटाचं छायांकन हरेश सावंत यांचं असून कलादिग्दर्शक केशव ठाकुर आहेत. श्रेयस राज आंगणे, श्रमेश बेटकर लिखित गीतांना श्रेयस राज आंगणे आणि किशोर मोहिते यांचे संगीत लाभले आहे.नृत्यदिग्दर्शक म्हणून राहुल बनसोडे, रवी आखाडे यांनी काम पाहिले आहे. 

प्रेम या संकल्पनेचा एक वेगळा पदर 'लास्ट स्टॉप खांदा... प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट' या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. श्रमेश बेटकर, जुईली टेमकर ही नवी फ्रेश जोडी या चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. टीजरमध्ये एक मुलगी तिच्या आई-वडिलांकडे बोलते तिच्या भावना व्यक्त करते. माझं ब्रेकअप झाले आहे, मी आत्महत्या करते असं ती मुलगी म्हणते. त्या मुलीच्या मनोगतावर एक घनदाट झाड, समुद्र किनारा अशी देखणी व्हिज्युअल्स दिसतात. त्यामुळे आशय संपन्न, खुसखुशीत, हलकीफुलकी प्रेमकथा या चित्रपटातून अनुभवायला मिळणार असल्याचे संकेत या टीजरमधून मिळतात. संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन करणारा हा चित्रपट पाहण्यासाठी आता 21 नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पाहा Teaser :                               

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget