![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kusha Kapila Video: घटस्फोटानंतर कुशा कपिला व्हिडीओ शेअर करत म्हणाली , बेस्ट फ्रेंड अशी बनवा की, चार लोक म्हणतील...
लोकप्रिय युट्युबर कुशा कपिलाने काही दिवसांपूर्वी जोरावर सिंह अहलुवालिया सोबत घटस्फोट घेतला. या मोठ्या ब्रेकनंतर तिने दणक्यात कमबॅक केले आहे.
![Kusha Kapila Video: घटस्फोटानंतर कुशा कपिला व्हिडीओ शेअर करत म्हणाली , बेस्ट फ्रेंड अशी बनवा की, चार लोक म्हणतील... Kusha Kapila Shares Collab Video With Deepika Padukon On Instagram News Marathi Kusha Kapila Video: घटस्फोटानंतर कुशा कपिला व्हिडीओ शेअर करत म्हणाली , बेस्ट फ्रेंड अशी बनवा की, चार लोक म्हणतील...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/05/3e7828d9781387cbbbe85003d1adcaea1688568701626766_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kusha Kapila Collab Viral Video : लोकप्रिय युट्युबर कुशा कपिलाने काही दिवसांपूर्वी जोरावर सिंह अहलुवालिया सोबत घटस्फोट घेतला. लग्याच्या सहा वर्षानंतर कुशाचा घटस्फोट झाला आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिने ही माहीती दिली होती. या पोस्टनंतर अनेक दिवस कुशाने सोशल मीडियापासून ब्रेक घेतला होता. या मोठ्या ब्रेकनंतर तिने दणक्यात कमबॅक केले आहे. तिने नुकताच इंस्टाग्रामवर तिचा आणि दीपिकाचा एक व्हीडिओ टाकला आहे.
या व्हीडिओमध्ये तिने "ये जवानी है दिवानी" या चित्रपटातील फेमस डायलाॅग बोलला आहे. तर दीपिकाच्या फेमस स्किनकेअर ब्रँडचे या व्हीडिओद्वारे प्रमोशन केले आहे. तसेच हा व्हीडिओ पब्लिश केल्यानंतर तिने तिच्या चाहत्यासाठी एक मेसेज शेअर केला ज्यात ती म्हणाली आहे ," माझ्या पोस्टला एवढे प्रेम दिले त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही लिहीलेल्या सगळ्या कमेंट्स मी वाचल्या आहेत. खूप खूप धन्यवाद." व्हीडिओखाली कॅप्शन लिहीला आहे , "बेस्ट फ्रेंड अशी बनवा कि, चार लोक म्हणतील ही तर माझी ही बेस्ट फ्रेंड आहे."
नेहमीप्रमाणे तिचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत असून अनेक यूजर्सनी त्यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका कमेंटमध्ये "ओह माय गॉड"असे लिहिले आहे. स्टँड-अप कॉमेडियन सुमुखी सुरेशने क्लिपमध्ये कुशा आणि दीपिका BFF असल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. तिने लिहिले, "मला माफ करा? दिपू फक्त माझी मैत्रिण आहे." तर काही जणांनी लिहिले आहे, "82°E साठी सर्वोत्कृष्ट मार्केटिंग व्हिडिओ आहे हा." एकाने लिहीले आहे, "किती ती ओव्हरअॅक्टींग."
घटस्फोटानंतर अनेकांनी कुशाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. या ट्रोलिंगला उत्तर देत जोरावर सिंह अहलुवालियाने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने लिहिले होते की, "आम्ही ज्याप्रमाणे लग्नाचा निर्णय घेतला, तसाच वेगळे होण्याचा निर्णय देखील आम्ही एकमेकांच्या सहमतीने घेतला आहे. हा निर्णय घेणे आमच्या दोघांकरता अवघड आहे , मात्र आम्ही वेगळे होणे हे आमच्यासाठी चांगले आहे. मात्र सोशल मिडीयावर लोक कुशाला वाईट बोलत आहेत. यामुळे मी निराश झालो आहे." जोरावरने केलेल्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले होते.
कुशा कपिला फक्त सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसून मनोरंजनसृष्टीतदेखील तिने काम केलं आहे. अनेक वेबसीरिजमध्ये तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कुशा जाहिराती आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपये कमावते. कुशा बॉलिवूडमध्येही झळकली आहे. अक्षय कुमारच्या 'सेल्फी' आणि रितेश देशमुखच्या 'प्लॅन ए प्लॅन बी' या सिनेमातदेखील तिने काम केलं आहे. तसेच छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रमांमध्ये ती सहभागी झाली आहे. तसेच 'मसाबा मसाबा' या सिरीजमध्येही तिने काम केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Kriti Sanon: क्रिती सेनन झाली निर्माती; 'दो पत्ती'ची केली घोषणा, 8 वर्षानंतर काजोलसोबत करणार काम
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)