Sitaare Zameen Par Box Office Collection Day 7: बॉक्स ऑफिसवर आमिर खानचा बोलबाला, कमाईत बजेटच्या 155 टक्क्यांची वसुली; लवकरच 'छावा'ला मागे टाकणार?
Sitaare Zameen Par Box Office Collection Day 7: आमिर खानच्या चित्रपटानं 6 दिवसांत जगभरात 132 कोटी रुपये कमावले आहेत. अनेक अहवालांनुसार, चित्रपटाचे बजेट सुमारे 90 कोटी रुपये आहे.

Sitaare Zameen Par Box Office Collection Day 7: आमिर खानच्या (Aamir Khan) 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) या चित्रपटाचे प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही कौतुक केलंय. चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे आणि तरीसुद्धा चित्रपटाच्या कमाईत काडीमात्र घट झालेली नाही.
'सितारे जमीन पर'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत (Box Office Collection) बोलायचं झालं तर, खालील तक्त्यामध्ये, तुम्ही चित्रपटाच्या प्रत्येक दिवसाच्या कमाईचे आकडे पाहू शकता. आजचा Scinalc वर उपलब्ध असलेला डेटा सकाळी 10.30 वाजेपर्यंतचा आहे आणि तो अंतिम नाही. त्यात बदल होऊ शकतात.
| दिवस | बॉक्स ऑफिस कलेक्शन (कोटींमध्ये) |
| दिवस 1 | 10.7 |
| दिवस 2 | 20.2 |
| दिवस 3 | 27.25 |
| दिवस 4 | 8.5 |
| दिवस 5 | 8.5 |
| दिवस 6 | 7.25 |
| दिवस 7 | 6.75 |
| एकूण | 89.15 |
'सितारे जमीन पर'चं वर्ल्डवाइड कलेक्शन
सॅक्निल्कवर उपलब्ध असलेल्या अहवालानुसार, आमिर खानच्या चित्रपटानं 6 दिवसांत जगभरात 132 कोटी रुपये कमावले आहेत. अनेक अहवालांनुसार, चित्रपटाचे बजेट सुमारे 90 कोटी रुपये आहे. जर आपण आजच्या देशांतर्गत कलेक्शनला चित्रपटाच्या जगभरातील कमाईत जोडलं तर चित्रपटानं त्याच्या बजेटच्या सुमारे 155 टक्के कमाई केली आहे.
'सितारे जमीन पर'च्या निशाण्यावर 'हे' 3 सिनेमे
या वर्षी प्रदर्शित झालेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांची यादी पाहिली तर ते असे आहे-
- पहिल्या क्रमांकावर 'छावा' (601.54 कोटी)
- दुसऱ्या क्रमांकावर 'हाऊसफुल' (192 कोटी),
- तिसऱ्या क्रमांकावर 'रेड 2' (173.05 कोटी),
- चौथ्या क्रमांकावर 'स्काई फोर्स' (112.75 कोटी),
- पाचव्या क्रमांकावर 'सिकंदर' (110.1 कोटी),
- सहाव्या क्रमांकावर 'केसरी चॅप्टर 2' (92.53 कोटी),
- सातव्या क्रमांकावर 'जाट' (88.26 कोटी)
या यादीत, सर्वात खालच्या क्रमांकाच्या चार चित्रपटांचे रेकॉर्ड धोक्यात आहेत. सर्वात आधी सनी देओलचा 'जाट' आणि नंतर अक्षय कुमारचा 'केसरी 2'चं लाईफटाईम कलेक्शन मागे पडेल. त्यानंतर, 'सिकंदर' आणि 'स्काय फोर्स'चे रेकॉर्डही धोक्यात आले आहेत.
दरम्यान, आरएस प्रसन्ना दिग्दर्शित हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. आमिर खान व्यतिरिक्त, जिनेलिया डिसूझा देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपटात विनोद आणि भावनांचं मिश्रण करून एक सुंदर संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























