Kshitij Patwardhan : महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या दोन घटनांवर मराठी दिग्दर्शकाची संतप्त पोस्ट, म्हणाला, 'आपण नाव, जागा बदलत श्रद्धांजलीच्या पोस्ट...'
Kshitij Patwardhan Post: सध्या महाराष्ट्रातील घडलेल्या दोन घटनांमुळे संतापाचं वातावरण आहे. त्यावर आता एका मराठी दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत आली आहे.
Kshitij Patwardhan Post: मागील काही दिवसांत महाराष्ट्र दोन घटनांनी पुरता हादरुन गेला. पहिली घटना म्हणजे घाटकोपर होर्डींग आणि दुसरी म्हणजे पुणे पोर्शे कार अपघात. भर पावसात घाटकोपरमधील एक भलं मोठं होर्डींग एका पेट्रोल पंपावर पडलं आणि अनेक निष्पापांनी त्यांचा जीव गमवला. त्याच्या काही दिवसांतच पुण्यात एका अल्पवयीने धनिकपुत्राने भरधाव वेगात गाडी चालवून दोघांना चिरडलं. यामध्ये दोन तरुण इंजिनिअर्सनी त्यांचा जीव गमावला. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात संतापाची बरीच लाट उसळली आहे. पण यावर दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन (Kshitij Patwardhan) याने केलेली पोस्ट अनेकांना विचारात पाडणारी आहे.
क्षितीजने फेसबुकवर अवघ्या दोन ओळींची पोस्ट केली आहे. पण त्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत या गोष्टीला दुजोरा देखील दिला आहे. त्यामुळे अगदी समान्यांपासून ते कलाकारांपर्यंत या संपूर्ण घटनांवर तीव्र रोष व्यक्त करण्यात येतोय. घाटकोपरमध्ये 15 मे रोजी आलेल्या वादळात होर्डींग कोसळलं, तर पुण्यात रविवारी घडलेल्या अपघातामध्ये दोघांचा जीव गेला. या दोन्ही घटनांमधील आरोपींवर कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई झाली नसली तरीही या दोन्ही प्रकरणांना धरुन सध्या राजकीय वर्तुळांमध्ये मात्र आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरु आहे.
क्षितीजची पोस्ट नेमकी काय?
क्षितीजने त्याच्या फेसबुकवर या दोन्ही घटनांवर भाष्य करणारी एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं की, 'मुंबईत होर्डींग असो किंवा पुण्यात गाडी, या देशात गुन्हा दडवायला जेवढ्या तत्परतेने सिस्टीम एकत्र येते, तेवढी सोडवायला येत नाही हे खरं दुर्दैव आहे. आपण नाव, जागा बदलत श्रद्धांजलीच्या पोस्ट लिहायच्या फक्त!'
घाटकोपरमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत 13 मे रोजी आलेल्या वादळी वाऱ्याने घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर असलेल्या मोठ्या आकाराचे होर्डिंग कोसळले. अनेक नागरीक त्याखाली अडकले. त्यातील काहींची सुखरुप सुटका झाली. तर काहींना प्राण गमवावे लागले. घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगमुळे (Ghatkopar Hoarding Accident) 16 मुंबईकरांना नाहक प्राण गमावाले.
पुण्यात नेमकं काय घडलं?
वेंदात अग्रवाल हा धनिकपुत्र बारावी पास झाला म्हणून रात्री मित्रांसोबत graduation party करण्यासाठी गेला होता. पार्टीला जाताना वडिलांची आलिशान पॉर्शे कार घेऊन तो गेला.पार्टी संपवून वेदांत ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि ड्रायव्हरला शेजारी बसवले. त्याचे दोन मित्र देखील गाडीत मागे बसलेले होते. दारूच्या नशेत वेदांतने गाडीचा स्पीड वाढवला , ट्रम्प टॉवर समोर आल्यानंतर त्याचा कंट्रोल सुटला आणि त्याने समोरच्या पल्सरला धडक दिली.यामध्ये दोन आयटी तरुणांचा जीव गेला. अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा अशी या तरुणांची नावं आहे.