Kshitee Jog : बाईला पैसे आणि धंदा नक्की कळतो का? क्षिती जोग स्पष्टच म्हणाली, 'बाई कटकट करते पण...'
Kshitee Jog : अभिनेत्री क्षिती जोग ही पुन्हा एकदा तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. क्षितीने नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
Kshitee Jog : अभिनेत्री क्षिती जोग (Kshitee Jog) हीने नुकतच मंगळसूत्रावरुन मांडलेल्या तिच्या मतामुळे चांगलीच चर्चेत आली होती. क्षितीने नुकतच मुग्धा गोडबोले रानडेला (Mugdha Godbole Ranade) दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. सध्या क्षितीच्या या वक्तव्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. आता पुन्हा एकदा क्षितीच्या एका वक्तव्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली.
अभिनेत्री मुग्धा गोडबोलेने 'आरपार' या यु्ट्युब चॅनेलसाठी अभिनेत्री-निर्माती क्षिती जोगची मुलाखत घेतली. अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांची पसंती मिळवण्यानंतर क्षितीने निर्मितीच्या क्षेत्रातही पाऊल ठेवलं.त्यामुळे यावेळी क्षितीला विचारण्यात आलं की, बाईला पैसा आणि धंदा नक्की कळतो का? यावर क्षितीने दिलेलं उत्तर हे सध्या अनेकांच्या पसंतीस पडत आहे. क्षितीने नेमकं काय म्हटलं त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
तर घरं चाललीच नसती - क्षिती जोग
क्षितीने या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं की, बाईला जर पैश्यातलं आणि ह्यातलं कळलं नसतं तर घर चाललीच नसती. नुसता पगार आणून जर घर चालली असती, म्हणजे बाई बसून राहणार आणि बाकी पगार वैगरे ठेवलं की आपोआप येणार. असं नाही होतं. ती तिचं सगळं घर सांभाळत असते. ती कमी पगारात पण साभांळते आणि खूप पगारात पण सांभाळते. मला असं वाटतं की त्यांना भीती वाटते अनेकदा, कारण तिला मूर्ख बनवता येत नाही.
बाईने केली ती कटकट होते - क्षिती जोग
पुढे बोलताना क्षितीने म्हटलं की, बाई म्हणजे याबाबतीत निदान मी तरी, 100 रुपयांसाठी देखील मरामारी करते. कारण जेव्हा एका चित्रपटाचा विषय येतो तेव्हा मला त्या बजेटमध्ये ते बसवायचं असतं. मग असं होतं की, बाई कटकट करते, पण अशी वेळच का येते, की कटकट करावी लागते. पुरुषाने केलं तर ते बारगेन आणि बाईने केलं तर ती कटकट. पण या सगळ्याला बाईने न जुमनता कटकट तर कटकट हे असंच आहे, तुम्हाला जुळवून घ्यावच लागेल, असं म्हणत क्षितीने तिचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
क्षितीने सांगितला मंगळसूत्राचा किस्सा
क्षिती जोगने मंगळसूत्र न घालण्याबाबतचा एक किस्सा या मुलाखतीदरम्यान सांगितला आहे. त्यावरून तिने लग्न झालंय तर फक्त मुलींनाच मंगळसूत्र का घालावं असा प्रश्न केला. क्षितीच्या या व्हिडीओवर अश्लील, शिवीगाळ करणाऱ्या कमेंट्स आल्या. काहींनी क्षिती जोगला संस्कृतीचा दाखला दिला. तर काहींनी तिचे संस्कारही काढले.