Kranti Redkar: कठीण काळात इंडस्ट्री पाठ फिरवून उभी होती, अनेकांकडून फक्त वरवरची चौकशी; पण 5 जणांनी दिली खरी साथ! क्रांती रेडकर पहिल्यांदाच 'त्या' दिवसांबद्दल बोलली
Kranti Redkar : कठीण काळात इंडस्ट्रीने पाठ फिरवली असली तर काही लोकं माझ्यापाठीशी उभी होती त्यांनी मला खरी साथ दिल्याचा खुलासा अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) केला आहे.

Kranti Redkar : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aaryan Khan) याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर एनसीबीचे माजी प्रमुख अधिकारी आणि मराठामोळी अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती समीर वानखेडे (Sameer Wankhede) चर्चेत आले होते. तसेच, याप्रकरणी मोठी लाच घेतल्याचा आरोपही समीर वानखेडेंवर करण्यात आले. सोबतच या प्रकरणात समीर वानखेडे यांची ईडी चौकशी देखील करण्यात आली. त्यानंतर समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची प्रकार देखील घडला होता. एकंदरीत या कठीण काळात त्यांना मोठ्या मानसिक त्रासाला समोर जावं लागलंय. मात्र या कठीण काळात इंडस्ट्रीने पाठ फिरवली असली तर काही लोकं माझ्यापाठीशी उभी होती त्यांनी मला खरी साथ दिल्याचा खुलासा अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) केला आहे. एका मुलाखतीत तिने या कठीण काळाचे वर्णन करताना हि प्रतिक्रिया दिली आहे.
Kranti Redkar: कठीण काळात इंडस्ट्रीतल्या मोजक्या 5-6 लोकांनी मला मानसिक आधार दिला
समीर वानखेडे एनसीबीत असताना झालेल्या आरोपांमुळे आणि त्यानंतरच्या चौकशांमुळे माझं कुटुंब प्रचंड तणावात होते. एकटेच आम्ही या संकटाचा सामना करत होतो. पण या कठीण काळात इंडस्ट्रीतल्या मोजक्या 5-6 लोकांनी मला मानसिक आधार दिला, ज्याचा खुलासा अभिनेत्री क्रांती रेडकरने स्वतः एका मुलाखतीत केला आहे. यावेळी ती म्हणाली ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आज आपल्यात नाहीत, पण त्या कठीण काळात ते माझ्यासाठी एका वडिलांसारखे उभे राहिले. क्रांती पुढे सांगताना म्हणाली की, विक्रम काका दर दोन दिवसांनी फोन करायचे. "बेटा, मी आहे हा... तू लढ, मध्यरात्री गरज लागली तरी फोन कर," असे सांगत त्यांनी मोठा मानसिक आधार दिला. केवळ एका सिनेमात सोबत काम केले असूनही त्यांनी दाखवलेली ही आपुलकी माझ्यासाठी खूप मोठी होती. दुसरा महत्त्वाचा आधार मिळाला तो सुबोध भावे आणि त्याची पत्नी मंजिरी यांच्याकडून! सुबोधने फोन करून सांगितले होते, "क्रांती, तू कमाल लढतेयस. पण यात तुझी मुलं लहान आहेत, तुला कधीही वाटलं की मुलांकडे बघायला कोणी हवंय, तर त्यांना बिंधास्त आमच्याकडे सोड आणि तू लढायला जा." एका आईसाठी आणि पत्नीसाठी या शब्दांचा आधार किती मोलाचा असतो, हे शब्दांत सांगणे कठीण आहे.
Kranti Redkar : बाकी अनेकांनी फक्त वरवरची चौकशी केली, पण या 5-6 जणांनी खऱ्या अर्थाने...
विक्रम गोखले आणि सुबोध भावे यांच्यासोबतच प्राजक्ता माळी, बिजय आनंद आणि मेघा धाडे हे कलाकारही पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. बाकी अनेकांनी फक्त वरवरची चौकशी केली, पण या 5-6 जणांनी खऱ्या अर्थाने जबाबदारीची जाणीव ठेवून मैत्री निभावली. संकटात जो साथ देतो, तोच खरा मित्र असतो हेच यातून दिसून येते! अशी प्रतिक्रिया क्रांतीने यावेळी बोलताना दिली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























