Ankita Walavalkar Mehendi: 'कोकण हार्टेड गर्ल'च्या लग्नाची सुरू झाली तयारी! अंकिताच्या हातावर रंगली कुणालच्या नावाची मेहंदी
Ankita Walavalkar Mehendi: नुकताच अंकिता आणि कुणालचा मेहेंदी सोहळा पार पडला, या सोहळ्याचे फोटो अंकिताने तिच्या सोशल मिडिया अकाउंटवरती शेअर केले आहेत.

Ankita Walavalkar Wedding: 'बिग बॉस मराठी' फेम आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अंकिता वालावलकर (Ankita Walavalkar) लवकरच आपल्या आयुष्यातील एका नवीन पर्वाला सुरुवात करणार आहे. अंकिता लवकरच (Ankita Walavalkar) कुणाल भगतसोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. अंकिता आणि कुणालच्या लग्नाची तयारी जोरात सुरू असून, त्यांच्या लग्नापूर्वीच्या सर्व कार्यक्रम आणि विधींना सुरुवात झाली आहे. नुकताच अंकिता (Ankita Walavalkar) आणि कुणालचा मेहेंदी सोहळा पार पडला, या सोहळ्याचे फोटो अंकिताने तिच्या सोशल मिडिया अकाउंटवरती शेअर केले आहेत.
अंकिताने (Ankita Walavalkar) मेहेंदी सोहळ्यासाठी वेस्टर्न आऊटफिट घालते होते, आणि यामध्ये तिचा स्टाइलिश लुकचे फोटो देखील समोर आले आहेत. अंकिताच्या हातावर कुणालच्या नावाची मेहेंदी रंगली असून, या सोहळ्याचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. अंकिता आणि कुणाल दोघेही कोकणात लग्न करणार आहेत, आणि त्यांच्या लग्नासाठी अनेक सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्स, अंकिताची मित्रमंडळी, बीग बॉस मधील तिचे सगळे मित्र कोकणात पोहोचले आहेत. यामध्ये प्रसिद्ध इन्फ्ल्युएन्सर धनंजय पोवार (डीपी दादा) यांनाही अंकिताच्या लग्नासाठी कोकणात उपस्थिती लावली.
अंकिता आणि कुणाल यांच्या मेहेंदी सोहळ्यानंतर अंकिता आणि कुणालच्या टीममध्ये समुद्रकिनाऱ्यावर क्रिकेटचा सामना रंगला, ज्यात सर्वानी एकत्रितपणे वेळ घालवला आणि आनंद साजरा केला. अंकिता आणि कुणाल यांच्या लग्नाच्या आनंदाच्या क्षणांची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे, आणि त्यांचे चाहते सोशल मिडियावरती या दोघांना शुभेच्छा देत आहेत. अंकिता प्रभू वालावकरने होणारा नवरा कुणाल भगतसह मेहंदी कार्यक्रमाचे फोटो शेअर केले असून तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
कोण आहे कुणाल भगत?
कुणाल भगत हा सुप्रसिद्ध संगीतकार असून त्याने अनेक मालिका, सिनेमांच्या संगीताची कामे केलेली आहेत. कुणाल आणि अंकिता गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. कुणालच्या सोशल मीडियावर त्याचे अंकिता सोबतचे खास फोटो शेअर केलेले आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर अंकिता वालावलकरने बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबतच्या नात्याची ग्वाही दिली होती. त्यासोबत अंकिता आणि कुणाल लवकरच लग्न करणार असल्याचंही चाहत्यांना तिने त्यावेळी सांगितलं होतं. अंकिताने सोशल मीडियावर तिचा होणारा नवरा कुणालसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत ही आंनदाची बातमी दिली होती. अंकिता वालावलकरचा होणारा नवरा कुणाल भगत संगीत दिग्दर्शक आहे. कुणालने अनेक चित्रपट आणि मालिकांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

