KGF 2 : यशपेक्षाही लहान, तरी ‘केजीएफ 2’मध्ये साकारली ‘रॉकी भाई’च्या आईची भूमिका! जाणून घ्या ‘या’ अभिनेत्रीबद्दल...
Archana Jois : ‘केजीएफ’मध्ये रॉकी भाईच्या ‘आई’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला विशेष पसंती मिळत आहे.
![KGF 2 : यशपेक्षाही लहान, तरी ‘केजीएफ 2’मध्ये साकारली ‘रॉकी भाई’च्या आईची भूमिका! जाणून घ्या ‘या’ अभिनेत्रीबद्दल... Know About KGF 2 Rocky Bhai’s Mother fame actress Archana Jois KGF 2 : यशपेक्षाही लहान, तरी ‘केजीएफ 2’मध्ये साकारली ‘रॉकी भाई’च्या आईची भूमिका! जाणून घ्या ‘या’ अभिनेत्रीबद्दल...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/24/6c0db984650187512493f9279b48b544_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Archana Jois : सुपरस्टार यशचा (Yash) ‘केजीएफ 2’ (KGF 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. ‘केजीएफ’मध्ये रॉकी भाईच्या ‘आई’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला विशेष पसंती मिळत आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे अर्चना जोईस (Archana Jois). वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी अर्चनाने ‘आई’ची भूमिका सकारात वाहवा मिळवली आहे.
प्रशांत नील दिग्दर्शित, 'KGF 2' 14 एप्रिल रोजी कन्नड, तेलुगू, हिंदी, तमिळ आणि मल्याळममध्ये रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. इतकेच नाही, तर या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.
‘आई’ची भूमिका साकारणारी ग्लॅमरस अभिनेत्री!
‘केजीएफ 2’मध्ये ‘रॉकी भाई’च्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अर्चना जोईस खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे. अर्चना अभिनेत्री असण्याबरोबरच यशस्वी मॉडेल देखील आहे. याशिवाय ती कथ्थक नृत्यात पारंगत आहे. तिने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. ‘केजीएफ’ या चित्रपटाने तिला विशेष प्रसिद्धी मिळवून दिली. अर्चना आणि यशची जबरदस्त बाँडिंग चित्रपटात दाखवण्यात आली असून, या बाँडिंगने प्रेक्षकांचे डोळे पाणावले आहेत. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अभिनेत्री अर्चना, यशपेक्षा 9 वर्षांनी लहान आहे.
IMDbवरही चित्रपट ठरला बेस्ट!
चित्रपटाच्या कथेपासून ते दमदार अॅक्शन सीक्वेन्स आणि रॉकी भाईचे दमदार संवाद चाहत्यांना खूप आवडत आहेत. एकीकडे KGF 2 (हिंदी) हा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला, तर दुसरीकडे या चित्रपटाने आता IMDb वरही आपली जादू दाखवली आहे. चित्रपटाला IMDb वर जबरदस्त रेटिंग मिळाले आहे. KGF Chapter 2ला 9.7 रेटिंग मिळाले आहे. सरासरी 42 हजार मतांच्या आधारे हे रेटिंग घेण्यात आले आहे. DNA मधील अहवालानुसार, IMDb वर भारतीय चित्रपटासाठी हे सर्वोच्च रेटिंग आहे. KGF 2 ने Jr NTR- राम चरणचा ‘RRR’ आणि सुर्याच्या ‘जय भीम’लाही मागे टाकले आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)