एक्स्प्लोर

Prajakta Mali :अचानकभयानक 'समस्त महिलावर्गाविषयी' पुळका येणं विनोदी; प्राजक्ता माळी प्रकरणात किरण मानेंची पोस्ट

Prajakta Mali : किरण माने यांनी प्राजक्ता माळीवरील वक्तव्याचा तीव्र निषेध केला असून खोचक टोलाही लगावला आहे.

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या (Prajakta Mali) समर्थनार्थ कलाकार तसेच राजकीय क्षेत्रातील अनेकांनी भाष्य केलं आहे. नुकतच ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी देखील पोस्ट करत घडलेल्या प्रकारावर निषेध व्यक्त केला आहे. पण यावेळी त्यांनी एक खोचक टोला देखील लगावला आहे. अनेक घटनांचा दाखला देत तेव्हा मूग गिळून गप्प बसणाऱ्यांना आता 'समस्त महिलावर्गाविषयी' पुळका वगैरे कसा आला असा प्रश्न उपस्थित केला आहे. 

आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीविषयी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकारण बरंच तापलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना बीडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख केला. त्याचवेळी त्यांनी काही अभिनेत्रींचीही नावं घेतलीत.त्यामध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचंही नाव घेतलं. प्राजक्ताचं नाव घेतल्यानंतर अभिनेत्री त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत महिला आयोगात तक्रार केली. तसेच सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणीही प्राजक्ताने या माध्यमातून केली आहे. सोशल मीडियावरही प्राजक्ताच्या समर्थनार्थ अनेक कलाकारांनी पोस्ट केल्याचं पाहायला मिळालं. किरण माने यांनीही प्राजक्ताच्या वक्तव्याचा निषेध केलाय. पण त्यांनी खोचक असा टोलाही लगावला आहे. 

किरण माने यांची पोस्ट नेमकी काय?

किरण माने यांनी पोस्ट करत म्हटलं की, प्राजक्ताबाबतचे विधान निंदनियच आहे...त्याचा निषेध. पण सोनियाजींचे बिकीनीवरचे फोटोज व्हायरल झाले होते... कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणाविषयी दाद मागत होत्या... मणिपूरला भगिनींची विटंबना झाली... तेव्हा जे महाभाग मुग गिळून वगैरे गप्प बसले, त्यांना अचानकभयानक 'समस्त महिलावर्गाविषयी' पुळका वगैरे यावा हे फार विनोदी वगैरे आहे !#सुमारांचा_थयथयाट

प्राजक्ता माळीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट

अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि निवेदन दिले. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्वस्त केले. माझ्याविरोधात युट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशीही तक्रार त्यांनी यावेळी केली. त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिले.

ही बातमी वाचा : 

Prajakta Mali Net Worth: महागड्या दागिन्यांचा ब्रॅण्ड, कर्जतचं फार्महाऊस अन् बरंच काही; प्राजक्ता माळी आहे कोट्यवधींची मालकीण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bird Strike on Flight : अवघा दीड किलोचा पक्षी दीड लाख किलो वजनाच्या विमानाला जमिनीवर कसे आणतो? बुलेटपेक्षा पक्ष्यांचा आघात जास्त धोकादायक आहे का?
अवघा दीड किलोचा पक्षी दीड लाख किलो वजनाच्या विमानाला जमिनीवर कसे आणतो? बुलेटपेक्षा पक्ष्यांचा आघात जास्त धोकादायक आहे का?
BJP : भाजपकडून अकोल्यातील 11 बड्या नेत्यांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
भाजपकडून अकोल्यातील 11 बड्या नेत्यांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dada Bhuse Nashik : दादा भुसेंचा पदग्रहण सोहळा; विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवानाCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 30 डिसेंबर 2024 :  ABP MajhaWalmik Karad Last Location : फरार वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन उज्जैनमध्ये; संकटकाळी देवाच्या दारीBabanrao Taywade on Dhananjay Munde : मुंडेंना टार्गेट केल्यास आम्ही आंदोलन करू;तायवाडेंचा थेट इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bird Strike on Flight : अवघा दीड किलोचा पक्षी दीड लाख किलो वजनाच्या विमानाला जमिनीवर कसे आणतो? बुलेटपेक्षा पक्ष्यांचा आघात जास्त धोकादायक आहे का?
अवघा दीड किलोचा पक्षी दीड लाख किलो वजनाच्या विमानाला जमिनीवर कसे आणतो? बुलेटपेक्षा पक्ष्यांचा आघात जास्त धोकादायक आहे का?
BJP : भाजपकडून अकोल्यातील 11 बड्या नेत्यांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
भाजपकडून अकोल्यातील 11 बड्या नेत्यांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
Walmik Karad: वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला, सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही
वाल्मीक कराडसमोर सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही, गेल्या 24 तासांत काय घडलं?
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
Walmik Karad: फरार वाल्मिक कराड पोलिसांच्या अंगरक्षरकांना घेऊन महाकालाच्या दर्शनाला? 'ते' फोटो समोर
वाल्मीक कराडचं शेवटचं मोबाईल लोकेशन सापडलं, संकटकाळी देवाच्या दारी, मुक्काम नेमका कुठे?
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
Embed widget