(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kiran Mane : '...तर विमानात महाराष्ट्रभर हास्याचा मळा फुलवणारी ही 'जत्रा' बसलीवती', किरण मानेंची हास्यजत्रेच्या कलाकरांसाठी खास पोस्ट
Kiran Mane : अभिनेते किरण माने यांनी हास्यजत्रेच्या कलाकारांसाठी एक खास पोस्ट केली आहे.
Kiran Mane Post : अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे सतत चर्चेत असतात. नुकतच त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करुन त्यांच्या राजकीय प्रवासाला देखील सुरुवात केली आहे. त्यांनी अभिनेता भरत जाधवसाठी नुकतीच एक पोस्ट केली होती. त्यांच्या या पोस्टने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. नुकतच त्यांनी केलेली अशीच एक सोशल मीडियाची पोस्ट चर्चेत आली आहे. सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi HasyaJatra) या मालिकेतील कलाकारांसाठी त्यांनी ही पोस्ट केली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून अभिनेते अरुण कदम, प्रसाद खांडेकर, ओमकार राऊत आणि प्रभाकर मोरे आणि अभिनेत्री शिवाली परब यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत त्यांच्या भेटीचा किस्सा देखील शेअर केला आहे. नागपूरच्या फ्लाईटला उशीर झाल्यानंतर फ्लाईटमध्ये भेटलेल्या या लोकांनी कशा प्रकारे मानेंना हाक मारली असा एक धम्माल किस्सा किरण माने यांनी यावेळी शेअर केला आहे.
View this post on Instagram
नेमकं काय घडलं?
अभिनेते किरण माने यांना त्यांच्या नागपूरच्या फ्लाईटसाठी उशीर झाला होता. यावर त्यांनी म्हटलं की, .काल नागपूरला जाताना भल्या पहाटेचं फ्लाईट होतं. नेहमीप्रमाणं वेळेवर जाग आलीच नाही. लेट पोहोचलो. बोर्डींग टाईम निघून गेलावता. धावतपळत धापा टाकत विमानात शिरलो. तर विमानातनं वेगवेगळ्या सीटवरनं "ओS मानेS याSSS" अशा हाका ऐकायला यायला लागल्या...दचकून बघितलं तर विमानात ही महाराष्ट्रभर हास्याचा मळा फुलवणारी ही 'जत्रा' बसलीवती ! त्यातले बरेच जुने सहकलाकार, मित्र.
हास्यजत्रेच्या कलाकरांचं आणि जुन्या मित्रांचं कौतुक
किरण माने यांनी भेटलेल्या प्रत्येकाविषयी या पोस्टमध्ये लिहिलं आहे, त्यांनी म्हटलं की, ओंक्या राऊतबरोबर सहासात वर्षांपूर्वी मी एक नाटक केलंवतं... त्यानंतर थेट आत्ताच भेटला. "सर, तुम्ही त्यावेळी जसे होता, तस्सेच अजूनही आहात." म्हणत मिठी मारली त्यानं. अरूण कदम दहाबारा वर्षांपूर्वी एका सिरीयलमध्ये माझा मोठा भाऊ झाला होता... तो बी भेटला. प्रभाकर मोरे तर लै लै लै जुना खास मित्र. प्रभ्याला आणि मला किती बोलू किती नको असं झालंवतं. नागपूरला एअरपोर्टमधून बाहेर पडेपर्यन्त आमच्या गप्पा संपत नव्हत्या. प्रसाद खांडेकर पुर्वीपास्नं 'नाटकवाला' दोस्त. शिवाली परब हास्यजत्रापासून माहिती झालेली गुणी पोरगी. श्याम राजपूत पयल्यांदाच भेटला.