एक्स्प्लोर

Kiran Mane : 'हे' साध्य करणारा सध्याच्या मराठी मनोरंजन क्षेत्रातला मी एकमेव अभिनेता! किरण मानेंची स्वत:साठी खास पोस्ट 

 Kiran Mane : अभिनेते किरण माने यांनी स्वत:साठी एक खास पोस्ट करत त्यांच्या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Kiran Mane : कधी राजकीय नेत्यांवर, कधी राजकारणावर तर कधी सध्याच्या घडामोडींवर ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेते किरण माने (Kiran Mane) त्यांची स्पष्ट मतं मांडत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपली स्पष्ट भूमिका घेत असतात. अनेकदा ते त्यांच्या ट्रोलर्सनाही सडेतोड उत्तर देत असल्याचं पाहायला मिळतं. नुकतच त्यांनी केलेल्या एका पोस्टमधून त्यांनी त्यांच्या ट्रोलर्सना तर उत्तर दिलंच आहे, पण त्यांनी स्वत:साठीही काही गोष्टी लिहिल्या आहेत. 

किरण माने यांना मालिकेतून काढून टाकल्यानंतरच्या काळाविषयी त्यांनी अनेकदा भाष्य केलं आहे. त्यानंतर सध्या अनेक प्रोजक्ट्समध्ये ते व्यस्त असून मालिका आणि सिनेमांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याविषयी त्यांनीच त्यांच्या पोस्टमध्ये माहिती दिली आहे. 

सध्याच्या मराठी मनोरंजन क्षेत्रातला मी एकमेव अभिनेता - किरण माने

किरण माने यांनी म्हटलं की, यांनी मला संपवण्यासाठी जीवाचं रान केलं. अर्वाच्य शिवीगाळ करत ट्रोल केलं. धमक्या दिल्या. त्यांच्या कारस्थानी नेत्यांना हाताशी धरून, सत्तेचा वापर करून माझं करीयर संपवण्यासाठी जीव खाऊन प्रयत्न केले. मला सिरीयलमधून काढले. एक रिॲलिटी शो व्होटिंगमध्ये जिंकूनही विजेता ठरवले नाही. पण त्यांच्या दुर्दैवानं याचा उलटा परिणाम झाला. माझ्या करीयरला आणि लोकप्रियतेला प्रचंड मोठा बूस्ट मिळाला. माझ्यावर अन्याय झाल्यामुळे मी पेटून उठलो आणि अभिनेत्यासह माझ्या 'आत' असलेला माणूस मी सर्वशक्तींनिशी प्रेक्षकांसमोर आणला. स्वबळावर, कुठल्याही गाॅडफादरशिवाय. लोकप्रियता दहापटींनी वाढली. एकाचवेळी अनेक क्षेत्रांत यशस्वी मुशाफिरी करण्याचं भाग्य खुप कमीजणांना लाभतं. आत्मप्रौढीचा दोष पत्करून सांगतो की अशी दुर्मिळ गोष्ट साध्य करणारा सध्याच्या मराठी मनोरंजन क्षेत्रातला मी एकमेव अभिनेता आहे. 

 वैविध्यपुर्ण आणि रसरशीत आयुष्य जगायला मिळतंय - किरण माने

पुढे त्यांनी म्हटलं की, 'यामुळे मला खुप वैविध्यपुर्ण आणि रसरशीत आयुष्य जगायला मिळतंय. कधी राजकारणातलं स्टेज गाजवायचं. कधी रंगभुमीवर काळजात जपून ठेवावे असे क्षण फुलवायचे. कधी परिवर्तनाच्या चळवळीत बुद्ध, तुकाराम, शिवशाहुफुलेआंबेडकरांचे विचार मांडायचे. कधी युट्युबवरच्या एखाद्या चॅनलवरच्या मुलाखतीत आपल्या आयुष्यातल्या अनेक अतरंगी तुकड्यांची जोडणी करत आपल्याच जगण्याचा धांडोळा घ्यायचा. कधी सिनेमा-टीव्हीच्या कॅमेर्‍यासमोर एखादी भन्नाट भुमिका अंतरंगासहित साकारायची. आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातनं जगभरातल्या मराठी माणसांशी रोज हे सगळं शेअर करत प्रेमाचे बंध जोडायचे ! किती भारीय राव हे सगळं.'

माझ्या चाहत्यांपुढं मी कायम नतमस्तक

मला सिरीयलमधून काढून टाकलं त्यावेळी मनावर जे घाव झाले त्याच्या जखमा आता पुर्णपणे बर्‍या झाल्या आहेत. भरपूर काम करतो आहे. अजूनही काही घाव होतात पण मनानं आता एक अशी 'लै भारी' अवस्था गाठलीय ज्यामुळं जखमाच होत नाहीत. आपल्यात असलेलं सगळं टॅलेन्ट, आपली सामाजिक भुमिका स्पष्ट-स्वच्छपणे आणि ठासून लोकांसमोर आणायला एक तळमळ, ध्यास आणि प्रेरणा लागते, ती मला या घावांमुळं मिळाली. अर्थात माझ्या पाठीशी उभं राहून मला प्रोत्साहन, ताकद, प्रेम देणार्‍या माझ्या चाहत्यांपुढं मी कायम नतमस्तक आहे, असं त्यांनी म्हटलं. 

भावाबहिणींनो, लवकरच माझी अजून एक नविन सिरीयल येतीये. काही सिनेमेही येताहेत. तुम्ही मला जे पहाडाएवढं प्रेम देताय, ते संघर्ष करणार्‍या असंख्य बहुजन पोरापोरींना बळ देणार आहे. भवतालच्या सामाजिक-सांस्कृतिक वातावरणात शत्रूंनी कितीही विष कालवलेलं असलं एकमेकांच्या साथीनं आपण ते निरभ्र-नितळ करूया. आपला भवताल सुंदर करूया, असं म्हणत किरण माने यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. 

ही बातमी वाचा : 

Aniket Vishwasrao : चार वर्षांनी अनिकेत विश्वासराव मोठ्या पडद्यावर, आषाढी एकादशीनिमित्त रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येणार खास भेट 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटेZero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावलाZero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Embed widget