![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
UBT Star Campaigners List : किरण माने, बांदेकर भोवजी ठाकरेंची मशाल घराघरात पोहचवणार, चांद्यापासून बांद्यापर्यंत स्टार प्रचारक प्रचार करणार
UBT Star Campaigners List : शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
![UBT Star Campaigners List : किरण माने, बांदेकर भोवजी ठाकरेंची मशाल घराघरात पोहचवणार, चांद्यापासून बांद्यापर्यंत स्टार प्रचारक प्रचार करणार Kiran Mane Adesh Bandekar Shivsena Thackeray Group Star Campaigners for Lok Sabha Election 2024 Entertainment Latest Update Marathi News UBT Star Campaigners List : किरण माने, बांदेकर भोवजी ठाकरेंची मशाल घराघरात पोहचवणार, चांद्यापासून बांद्यापर्यंत स्टार प्रचारक प्रचार करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/30/0e939916bd44e805f8a9d55c56b373601711777783890720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kiran Mane and Adesh Bandekar : सध्या देशासह महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) जय्यत तयारी सुरु आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाकडून स्टार प्रचारकांची यादी देखील जाहीर केली जातेय. नुकतीच शिवसेना ठाकरे गटाकडून (Shivsena Thackeray Group) स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अभिनेते किरण माने (Kiran Mane) आणि आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. आदेश बांदेकर हे शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आहेत. त्याचप्रमाणे किरण माने यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे आता हे स्टार प्रचारक ठाकरेंची मशाल घरोघरी पोहचवणार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी येत्या काही दिवसांतच प्रचाराच्या तोफा धडाडू लागतील. त्यासाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. शिवसेनेनेही आपल्या स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली आहे. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह 40 स्टार प्रचारकांचा समावेश आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ती प्रसिद्धीसाठी देण्यात आली.
'या' नेत्यांचा स्टार प्रचारक यादीमध्ये समावेश
या यादीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बड्या नेत्यांचा समावेश करण्यात आलाय. स्टार प्रचारकांमध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अनंत गिते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, आमदार अॅड. अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार सुनील प्रभू यांचा समावेश आहे.
शिवसेना नेत्यांबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, शिवसेना व युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानुगडे-पाटील, लक्ष्मण वडले, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, मनोज जामसुतकर, सुषमा अंधारे, संजय जाधव, किशोरी पेडणेकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, संजना घाडी, शीतल शेठ-देवरुखकर, जान्हवी सावंत, शरद कोळी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुनील शिंदे, विलास पोतनीस, वैभव नाईक, नितीन देशमुख, आनंद दुबे, किरण माने, सुभाष वानखेडे आणि प्रियंका जोशी यांचाही या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)