एक्स्प्लोर

Karmayogi Abasaheb : 'कर्मयोगी आबासाहेब' चित्रपटामधून उलगडणार दिग्गज व्यक्तिमत्त्व, बिग बॉस फेम छोटा पुढारीही खास भूमिकेत झळकणार

Karmayogi Abasaheb Movie : कर्मयोगी आबासाहेब चित्रपटात अभिनेता अनिकेत विश्वासराव स्वर्गीय मा. गणपतराव देशमुख ह्यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Karmayogi Abasaheb Movie Release Date : 'कर्मयोगी आबासाहेब' चित्रपटामधून दिग्गज व्यक्तिमत्त्व रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. या चित्रपटात अभिनेता अनिकेत विश्वासराव स्वर्गीय मा. गणपतराव देशमुख ह्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'कर्मयोगी आबासाहेब' चित्रपट 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं. 11 वेळा आमदार आणि तब्बल 55 वर्ष मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेल्या आबासाहेबांचा जीवप्रवास मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. 

'कर्मयोगी आबासाहेब'तून उलगडणार दिग्गज व्यक्तिमत्त्व

आबासाहेब यांचा जन्म वारकरी कुटुंबात झाला. वारकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील माणूस ते 11 वेळा आमदार होऊन 55 वर्ष मतदारसंघाचं नेतृत्व करण्याचा त्यांचा प्रवास प्रेक्षकांसमोर रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. स्वर्गीय मा . गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांचं जीवन या चित्रपटातून उलगडणार आहे. दमदार स्टारकास्ट असलेला "कर्मयोगी आबासाहेब" हा चित्रपट 25 ऑक्टोबरला मराठी आणि हिंदी भाषेत जगभरातील चित्रपटगृहात रिलीज होत आहे. या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच लाँच करण्यात आलं आहे. 

गणपतराव देशमुख ऊर्फ आबासाहेब यांचा जीवनप्रवास

'कर्मयोगी आबासाहेब' चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन अल्ताफ दादासाहेब शेख यांनी केलं आहे. गीतलेखनही त्यांनीच केलं आहे. मायका माऊली फिल्म प्रॉडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेन्मेंटच्या मारुती तुळशीराम बनकर, बाळासाहेब महादेव एरंडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अवधूत गुप्ते यांनी चित्रपटाच्या संगिताची जबाबदार चोख पार पाडली आहे.कुणाल गांजावाला, मनीष राजगिरे यांच्या गोड आवाजातील गाण्यांची या चित्रपटाला साथ आहे.  कुमार डोंगरे यांनी छायांकन आणि संकलनाची जबाबदारी निभावली आहे.  

अनिकेत विश्वासराव मुख्य भूमिकेत

चित्रपटात अनिकेत विश्वासराव याने आबासाहेबांची भूमिका साकारली आहे. याशिवाय हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, घनश्याम दरोडे उर्फ छोटा पुढारी, अहमद देशमुख,  वृंदा बाळ, निकिता सुखदेव,अली शेख, अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. 

प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत समाजासाठी योगदान

आबासाहेब यांनी राज्याच्या राजकारण, समाजकारणात महत्त्वाचं योगदान दिलं. तब्बल अकरा वेळा ते आमदार झाले. त्यात दोनवेळा कॅबिनेट मंत्रीपद भुषवण्याची संधी त्यांना मिळाली. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत समाजासाठी योगदान देणाऱ्या, आपल्या भागाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या, शेतकऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा वेध चित्रपटातून घेण्यात आला आहे. त्यामुळे आबासाहेबांना चित्रपटातून पुन्हा एकदा पाहण्यासाठी आता 25 ऑक्टोबरला चित्रपटगृहात नक्की जा.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss 18 : सलमान खानच्या बिग बॉस 18 मध्ये गाढवाचीही एन्ट्री, सदस्यांसोबत घरातच राहणार, एका स्पर्धकासोबत आहे खास कनेक्शन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Embed widget