"महाराष्ट्रातील पप्पूसेनेला माझ्याशिवाय करमतचं नाही", महाराष्ट्र सरकारवर कंगनाचा पुन्हा निशाणा
राज्य सरकरचा उल्लेख पप्पू सेना करत पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरोधात देशद्रोहचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शिवसेना सरकारने तिच्याविरोधात नवीन एफआयआर दाखल केला असल्याचा दावा बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत यांनी शनिवारी केला. महाराष्ट्रातील पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमतचं नाही, असा टोला कंगनाने या वेळी राज्य सरकारवरही टोला लगावला आहे. कंगनाने ट्विटरवरुन नवरात्रीचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यावेळी तिने राज्य सरकरचा उल्लेख पप्पू सेना करत पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.
आपल्या ट्वीटमध्ये कंगना म्हणाली की, "नवरात्रीमध्ये कोणी कोणी उपवास ठेवला आहे? आज नवरात्रीनिमित्त हे काही फोटो काढले आहे. कारण मी स्वतः उपवास ठेवला आहे. माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमतचं नाही. माझी इतकी पण आठवण काढू नका, मी लवकरचं येणार आहे."
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरोधात देशद्रोहचा गुन्हा दाखल करणयात आला आहे. एफआयआर दाखल करण्याचे आदेश वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले होते. धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप कंगनावर लावण्यात आला असून त्यामुळेच तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. कलम 124 अ, 153 अ, 295 अ, 34 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंगनाची बहीण रंगोली विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंगनावर गुन्हा दाखल दाखल करण्याची मागणी करणाऱ्या व्यक्तीने कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगना रनौतचे सर्व ट्वीट्स आणि व्हिडीओ सादर केले होते. त्यानंतर कोर्टाने कलम 156 (3) अंतर्गत कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. एफआयआर दाखल केल्यानंतर कंगनाची चौकशी होणार आणि जर कंगना विरोधात पुरावे मिळाले तर मात्र कंगनाला अटकही केली जाण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :