Kangana Ranaut Neha Singh Rathore : फक्त कंगनाच देशाची मुलगी आहे का? पॉर्न स्टारसोबतच्या तुलनेवर गायिका भडकली
Kangana Ranaut Neha Singh Rathore : गायिका नेहा सिंह राठोडची तुलना एका पॉर्नस्टारशी करण्यात आली. असे कृत्य करणारे भाजपशी संबंधित असल्याचा आरोपही गायिका नेहाने केला आहे.
Kangana Ranaut Neha Singh Rathore : अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) भाजपने हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा (Mandi Lok Sabha) मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारीच्या घोषणेनंतर काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून आक्षेपार्ह टीका झाल्यानंतर भाजपसह राष्ट्रीय महिला आयोगाने कारवाईची पावले उचलण्यास सुरुवात केली. मात्र, कंगना हीच एकमेव देशाची मुलगी आहे का, असा सवाल गायिकेने केला आहे. गायिका नेहा सिंह राठोडची तुलना एका पॉर्नस्टारशी करण्यात आली. असे कृत्य करणारे भाजपशी संबंधित असल्याचा आरोपही गायिका नेहाने केला आहे.
क्या सिर्फ़ कंगना रानौत ही देश की बेटी हैं?
— Neha Singh Rathore (@nehafolksinger) March 25, 2024
भाजपा की मीडिया को सिर्फ़ उनका ही अपमान दिखता है?
आज सुबह से ही पोर्नस्टार मिया ख़लीफ़ा के साथ मेरी फोटो लगाकर भाजपा की IT सेल और छुटभैये नेता ट्रेंड करवा रहे हैं और मुझे प्रताड़ित कर रहे हैं, वो किसी ज्ञानी को नहीं दिखता?
मोदीजी के… pic.twitter.com/IA6eA0r7t6
उत्तर प्रदेशातील लोकगायिका नेहा सिंह राठारेने मी देशाची मुलगी नाही असा प्रश्नच सरकारला विचारला आहे. नेहाची तुलना पॉर्नस्टार मिया खलिफाशी करण्यात आली. त्यावरून सोशल मीडियावर भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नेहा आणि पॉर्न स्टार मिया खलिफा यांच्या फोटोंची तुलना केली जात आहे. या फोटोवर अश्लील कमेंट्स करण्यात येत आहे. या प्रकाराने गायिका नेहा चांगलीच संतापली आहे. नेहा राठोडने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आज सकाळपासून भाजपचे आयटी सेल आणि छोटे-मोठे नेते पॉर्नस्टार मिया खलिफासोबतचा माझा फोटो ट्रेंड करत आहेत आणि मला त्रास देत आहेत, हे दिसत नाही का? अशा रीतीने मुलगी वाचणार का? असा प्रश्नही तिने केला.
उत्तर प्रदेशच्या सूनेचा अपमान होतोय...
नेहा सिंहने उत्तर प्रदेश सरकारवर प्रश्नांच्या फैऱ्या झाडल्या आहेत. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, पाहताय ना योगीजी कशाप्रकारे एका बिहारच्या मुलीला आणि उत्तर प्रदेशच्या सूनेला सोशल मीडियावर बदनाम केले जात आहे. माझी चूक काय आहे? मी सरकारला प्रश्न विचारते? ज्या गोष्टींसाठी माझं कौतुक करायला हवं, त्यासाठी माझा अपमान केला जातोय, हेच का ते भाजपचे सुशासन? मुलींचे संरक्षण असे करणार असे सवालच नेहाने मुख्यमंत्री योगी आदित्य यांना केला.
देख रहे हैं न योगीजी!
— Neha Singh Rathore (@nehafolksinger) March 26, 2024
किस तरह एक बिहार की बेटी और उत्तर प्रदेश की बहू को सोशल मीडिया पर बेइज्जत किया जा रहा है!
मेरी गलती क्या है?
यही कि मैं सरकार से सवाल पूछती हूँ?
जिस बात के लिए मुझे तारीफ़ मिलनी चाहिए थी, उसके लिए मुझे अपमानित किया जा रहा है.
क्या यही भाजपा का सुशासन…
फक्त कंगनाच देशाची मुलगी आहे का?
आपल्या आणखी एका पोस्टमध्ये नेहाने म्हटले की, माझ्या सन्मानासाठीच्या लढाईत तुम्हा सर्वांची साथ हवी. राष्ट्रीय महिला आयोग आणि मीडियाजवळ माझ्यासारख्या मुलीसाठी वेळ नसल्याचे तिने म्हटले. त्यांच्यासाठी फक्त कंगना रणौतच देशाची मुलगी आहे. सरकारला प्रश्न विचारण्याची किंमत मला मोजावी लागत आहे का, असा सवालच नेहा सिंह राठोडने केला.
मुझे अपने सम्मान की लड़ाई में आप सभी का साथ चाहिए.
— Neha Singh Rathore (@nehafolksinger) March 26, 2024
राष्ट्रीय महिला आयोग और मीडिया के पास मुझ जैसी मामूली लड़की के लिए समय नहीं है.
उनके लिए सिर्फ़ कँगना रानौत ही देश की बेटी हैं.
पूछिये सरकार से कि देश की बेटियों के साथ ये दोहरा बर्ताव क्यों किया जा रहा है?
क्या नेहा सरकार…
राष्ट्रीय महिला आयोगावर उपस्थित केले प्रश्न
नेहाने तिच्या पुढील ट्विटमध्ये राष्ट्रीय महिला आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने म्हटले की, “भारताचा राष्ट्रीय महिला आयोग हा करोडो महिलांसाठी नेहमीच आशेचा किरण राहिला आहे. पण आज मला जड अंत:करणाने सांगायचे आहे की, सध्या या आयोगाला केवळ भाजपशी संबंधित महिलांचे हित जपण्यातच रस आहे. मी खूप दु:खी असल्याचे तिने म्हटले.