Kangana Ranaut : कंगनानं घेतली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट; फोटो शेअर करत म्हणाली...
कंगनानं (Kangana Ranaut) एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रनौत(Kangana Ranaut) चित्रपटांबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आसते. कंगनानं शेअर केलेल्या पोस्ट नेहमी नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकतीच कंगनानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची भेट घेतली. कंगनानं याबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
कंगनाची पोस्ट
कंगनानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये योगी आदित्यनाथ हे तिला पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देताना दिसत आहेत. या पोस्टला कंगनानं कॅप्शन दिलं, ' काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणूकीमध्ये महाराज योगी आदित्यनाथ यांनी विजय प्राप्त केल्यानंतर त्यांची भेट घेण्याची संधी मला मिळाली. ती एक अद्भुत संध्याकाळ होती. योगीजींची करुणा, काळजी या सर्व भावना पाहून मी चकित झाले. मला सन्मानित आणि प्रेरित वाटले.'
View this post on Instagram
गेल्या वर्षी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर कंगनाला यूपी सरकारनं ओडीओपी (ODOP) वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट या प्रोग्रामची ब्रँड एंबेसिडर करण्यात आले. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट हा उत्तर प्रदेशचा एक असा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या स्वदेशी आणि विशेष उत्पादने, हस्तकला यांना प्रोत्साहन देण्यात येते.
कंगनाचे चित्रपट
कंगनाचा लवकरच धाकड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच सध्या लॉक-अप या शोमधून कंगना प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमाचे कंगना सूत्रसंचालन करते.
हेही वाचा :
- Dharmendra : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
- Satyavan Savitri : गोष्ट सत्यवान-सावित्रीची, प्रेमावरील विश्वासाची! नवी मालिका ‘सत्यवान सावित्री’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
- Payal Rohtagi : ‘चेहरा सुंदर दिसण्यासाठी सगळेच उपाय सांगतात, पण...’, पायल रोहतगीने व्यक्त केलं ‘त्या’ गोष्टीचं दुःख!