एक्स्प्लोर

Marathi Movie : के आसिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दणक्यात संपन्न, 'बनी' सर्वोत्कृष्ट तर ‘मोऱ्या’ कथा, अभिनय दिग्दर्शनासह अव्वल!

K Asif International Film Festival : उत्तर प्रदेशमध्ये नुकताच सहावा ‘के आसिफ-चंबळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022’ दणक्यात पार पडला आहे.

K Asif International Film Festival : उत्तर प्रदेशमध्ये पार पडलेल्या सहाव्या ‘के आसिफ-चंबळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022’मध्ये (K Asif International Film Festival) निर्माते शंकर धुरी यांच्या ‘आकृती क्रिएशन्स’ निर्मित आणि निलेश उपाध्ये लिखित-दिग्दर्शित 'बनी' (Bunny) या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, तर ‘टॉर्टुगा मोशन पिक्चर्स' निर्मित आणि जितेंद्र पुंडलिक बर्डे दिग्दर्शित ‘मोऱ्या’ (Morya) या चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट कथा, अभिनय आणि दिग्दर्शन अशा महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.

भारतातील ‘के आसिफ-चंबळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ जाणकार रसिकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी होत आहे. गेली सहा वर्षे हा महोत्सव उत्तर प्रदेशातील प्रख्यात लेखक दिग्दर्शक आणि निर्माते के. असिफ यांच्या नावे हा महोत्सव त्यांच्या जन्मभूमीत आयोजित करण्यात येतो. जगभरातील विविध आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी यानिमित्ताने येथील दर्दी रसिकांसाठी पर्वणी ठरत आहे.

'बनी'चा देशविदेशात डंका

'बनी'चा फर्स्ट लूक 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'इंडिया पॅव्हेलियन'मध्ये करण्यात आला, आणि त्यानंतर विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये 'बनी'च्या प्रवेशिका सादर करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. ढाका येथील प्रसिद्ध 'सिनेमेकिंग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' निवड झाल्यानंतर स्पेन येथील जगप्रसिद्ध 'माद्रिद' आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी या चित्रपटाची निवड झाली. त्यापाठोपाठ अमेरिकेतील 'फोर्ट स्मिथ’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव', पाकिस्तानातील ‘गंधार इंडिपेंडेंट’ चित्रपट महोत्सव, तसेच फरीझाबाद येथील ‘अयोध्या’ चित्रपट महोत्सवासाठी 'बनी'ची निवड झाली आहे. बनीच्या शीर्षक भूमिकेत बालकलाकार सान्वी राजे सोबत शैलेश कोरडे व शीतल गायकवाड या कसदार कलाकारांनी प्रमुख भूमिका समरसून निभावली आहे.

‘मोऱ्या’ची हृदयस्पर्शी कथा

शहराचा रोज घाण होणारा चेहरा जीवावर उदार होऊन, कोणत्याही मुलभूत सोई-सुविधांविना आपलं आरोग्य पणाला लावून नरकयातना भोगत गल्ल्या-गटारांची साफसफाई करणाऱ्या सिताराम जेधे उर्फ ‘मोऱ्या’ची हृदयस्पर्शी कथा ‘मोऱ्या’ या चित्रपटातून रेखाटण्यात आली आहे. लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता अशी त्रिसूत्री सांभाळणाऱ्या जितेंद्र पुंडलिक बर्डे यांची ही पहिलीच कलाकृती असून, 'ढाका येथील 'सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’-(CIFF) सोबत, ‘लव्ह & होप आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ बार्सिलोनामध्ये निवडला गेला आहे. या चित्रपटाच्या टीझरचे प्रदर्शन 'कान्स महोत्सवात' करण्यात आले होते, तेव्हाच चित्रपटाचा टिझर पाहून अनेक चित्रपट रसिक-समीक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती.

भारतातील एका महान चित्रपट कलावंताच्या नावे हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असल्याने हे पुरस्कार आमच्याकरिता विशेष महत्वाचे असल्याचे ‘बनी’चे निर्माते शंकर धुरी आणि ‘मोऱ्या’चे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता जितेंद्र पुंडलिक बर्डे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा :

Bunny : 'बनी' देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये! आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही मारली बाजी!

Bunny : मराठी चित्रपटांचे पाऊल पडते पुढे! थेट कान्सच्या व्यासपीठावर दिसली 'बनी'ची पहिली झलक!

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Johnny Lever Journey: 600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?
600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Embed widget