Jeetendra Shocking Video: जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
Jeetendra Shocking Video: 83 वर्षांचा अभिनेता अचानक अडखळला आणि खाली पडला, त्यामुळे उपस्थित सर्वच घाबरलेले. सुदैवानं त्यांना काही दुखापत झाली नाही, पण त्यांचे चाहते मात्र व्हिडीओ पाहून चिंतेत पडले आहेत.

Jeetendra Shocking Video: ऋतिक रोशन (Hrithik Roshan) ची एक्स वाईफ सुजैन खान (Sussanne Khan) ची आई आणि दिग्गज अभिनेता संजय खान (Sanjay Khan) यांच्या पत्नी जरीन खान (Zarine Khan) यांचं 7 नोव्हेंबर रोजी निधन झालं. सोमवारी, 11 नोव्हेंबर रोजी जरीन खान यांची प्रार्थना सभा आयोजित करण्यात आलेली. ज्यामध्ये कित्येक बडे स्टार्स पोहोचलेले. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जितेंद्र (Jeetendra) देखील जरीन खान यांच्या प्रेयर मीटसाठी पोहोचले होते. पण, तिथे त्यांच्यासोबत असं काहीतरी घडलं, जे अजिबात घडायला नको होतं. 83 वर्षांचा अभिनेता अचानक अडखळला आणि खाली पडला. सुदैवानं त्यांना काही दुखापत झाली नाही, पण त्यांचे चाहते मात्र व्हिडीओ पाहून चिंतेत पडले आहेत.
प्रार्थना सभेदरम्यान घडलेली घटना (Incident During the Prayer Meet)
सोमवार, 10 नोव्हेंबर रोजी, मुंबईत संजय खान (Sanjay Khan) यांच्या पत्नी जरीन खान यांच्या प्रार्थना सभेदरम्यान, ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते जितेंद्र यांचा तोल गेला आणि ते अचानक खाली कोसळले. 83 वर्षीय अभिनेते जरीन खान यांच्या प्रेयर मीटवेळी जाताना अडखळले आणि कोसळले. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये ते जमिनीवर कोसळताना दिसले, पण त्यांच्या आजूबाजूला उपस्थित असलेल्यांनी त्यांना मदत केली आणि ते उठून उभे राहिले.
सुदैवानं जितेंद्र यांना दुखापत झाली नाही
सुदैवानं, जितेंद्र (Jeetendra) यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. ते स्वतःहून उभे राहिले आणि हसत हसत तिथे उपस्थित असलेल्या पॅपाराझींशी बोलले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे चाहते अस्वस्थ झाले. अनेकांनी पॅपाराझींना फटकारलं, तसेच, अशा पर्सनल मूव्हमेंट शेअर करताना काही कसं वाटत नाही? असा प्रश्नही उपस्थित केला.
View this post on Instagram
जरीन खान यांची प्रार्थना सभा (Zarine Khan Prayer Meet)
जरीन खान (Zarine Khan) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. 7 नोव्हेंबर रोजी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. त्या 81 वर्षांच्या होत्या. जरीन खान (Zarine Khan) यांनी कधीकाळी इंडस्ट्री गाजवलेली. त्या दीर्घकाळ आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर त्यांचा मुलगा झायेद खान (Zayed Khan) यानं हिंदू विधीनुसार अंत्यसंस्कार केले. जरीन (Zarine) जन्मानं पारसी होत्या, पण त्या लग्नानंतर हिंदू परंपरांचं पालन करायच्या.
बॉलिवूड स्टार्सनी वाहिली श्रद्धांजली (Bollywood Stars Paid Tribute)
अनेक बॉलिवूड स्टार प्रार्थना सभेला उपस्थित होते. राणी मुखर्जी (Rani Mukerji), हृतिक रोशन (Hrithik Roshan), सबा आझाद (Saba Azad), आलिया गोनी (Aly Goni), जास्मिन भसीन (Jasmin Bhasin), मलायका अरोरा (Malaika Arora), जॅकी श्रॉफ (Jackie Shroff), हेलन (Helen), नील नितीन मुकेश (Neil Nitin Mukesh), ईशा देओल (Esha Deol), सलीम खान (Salim Khan) आणि फरदीन खान (Fardeen Khan) यांसारखे कलाकार श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. जरीन (Zarine) यांचं निधन बॉलिवूडसाठी एक मोठा धक्का होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























