एक्स्प्लोर

Jasmin Bhasin On Casting Couch Experience: 'त्यानं मला एक रुममध्ये डांबलं अन्...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला इंडस्ट्रीत आलेला घाणेरडा अनुभव

Jasmin Bhasin On Casting Couch Experience: बिग बॉस फेम जास्मिन भसीननंही तिला आलेला कास्टिंग काऊचचा एक्सपिरिअन्स शेअर केला आहे. जास्मिनला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक वेदनादायक अनुभव सांगितला आहे. 

Jasmin Bhasin On Casting Couch Experience: बॉलिवूडच्या (Bollywood News) झगमगत्या जगाला कास्टिंग काऊचच्या (Casting Couch) आरोपांचा विळखा बसला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आजवर अनेक अभिनेत्रींनी त्यांना आलेल्या धक्कादायक अनुभवांचा खुलासा केला आहे. अशातच आता टेलिव्हिजन स्टार आणि बिग बॉस फेम जास्मिन भसीननंही तिला आलेला कास्टिंग काऊचचा एक्सपिरिअन्स शेअर केला आहे. जास्मिनला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक वेदनादायक अनुभव सांगितला आहे. 

अभिनेत्री जास्मिन भसीन म्हणाली की, "ऑडिशनच्या बहाण्यानं एका दिग्दर्शकानं तिला हॉटेलच्या खोलीत बंद केलं आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला... या घटनेनं तिला हादरवून टाकलं आणि तिनं ठरवलं की, ती कधीही हॉटेलच्या खोलीत बैठका घेणार नाही. जास्मिननं नव्या कलाकारांना बनावट कास्टिंग कॉलपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे, जे मुलींना फसवण्याचे साधन बनतात. 

'द हिमांशू मेहता शो' मध्ये जस्मिननं तिला आलेला कास्टिंग काऊचचा एक्सपिरिअन्स शेअर केला. तिनं सांगितलं की, तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात ती जुहू येथील एका हॉटेलमध्ये ऑडिशनसाठी गेली होती. लॉबीमध्ये अनेक मुली आणि असिस्टंट होते. जेव्हा ती आत पोहोचली, तेव्हा तिला एक माणूस दिसला, जो तिला दारू पिऊन एक सीन शूट करायला सांगत होता. त्यानंतर असिस्टंट खोलीतून निघून गेला. जास्मीन म्हणाली होती की, "मी म्हणाले मी तयार होऊन उद्या येईन, पण त्यानं आग्रह धरला की, ते आत्ताच करावं लागेल. जेव्हा मी सीन शूट केलेला, तेव्हा तो म्हणाला, 'असं नाही.' मग तो म्हणाला, उभं राहून कर, जणू तुझा बॉयफ्रेंड निघून जातोय आणि  तू त्याला थांबवतेयस..."

पुढे बोलताना जास्मिन म्हणाली की, "त्यानं सांगितलं अगदी तसंच मी केलं. पण त्याला ते पटलं नाही. तो म्हणाला, नाही... नाही, असं नाही... त्यानंतर त्यानं मला एक रुममध्ये डांबलं आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होता... पण मग मी माझी संपूर्ण ताकद एकवटली आणि तिथून पळून गेले..." जास्मीन म्हणाली की, अगदी त्याचक्षणी मी ठरवलेलं की, आता इथून पुढे हॉटेलच्या रूममध्ये कोणत्याही मीटिंगसाठी जायचं नाही. आयुष्यात कधीच नाही...

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jasmine Bhasin (@jasminbhasin2806)

कास्टिंग काऊचवर काय म्हणाली जास्मिन? 

जास्मिन भसीन म्हणाली की, "मी म्हणेन की ते अजूनही आहे, पण जे लोक कास्टिंग कॉल करत आहेत, ते प्रत्यक्षात कास्टिंग करत नाहीत, ते कास्टिंग डायरेक्टर नाहीत, ते बेरोजगार लोक आहेत, जे फक्त त्यांच्या फायद्यासाठी हे करतायत. कारण ऑडिशन ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे, पण मी सर्वांना सांगू इच्छिते की, कायदेशीर कास्टिंग क्लॉज समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल, मला माहीत आहे की, प्रत्येकाला काम पाहिजे आहे आणि हेच डिप्रेशन आपल्याला चुकीच्या ठिकाणी घेऊन जातं... पण ज्यांना कास्टिंग करायचं आहे, ते कधीही कास्टिंग काउच करणार नाहीत."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mrunal Thakur In Relation With South Superstar Dhanush: साऊथ सुपरस्टार धनुषसोबत रिलेशनशिपमध्ये? आता मराठमोळ्या मृणाल ठाकूरनं सोडलं मौन, म्हणाली...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर

व्हिडीओ

Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : 19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Hasan Mushrif: दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
Aravali hills: हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
Embed widget