Mrunal Thakur In Relation With South Superstar Dhanush: साऊथ सुपरस्टार धनुषसोबत रिलेशनशिपमध्ये? आता मराठमोळ्या मृणाल ठाकूरनं सोडलं मौन, म्हणाली...
Mrunal Thakur On Relation With South Superstar Dhanush: सिनेमा रिलीज व्हायच्या आधीपासूनच त्यातील गाण्याच्या डान्स स्टेपमुळे चर्चेत आलेला. तर, अजय देवगण आणि मृणाल ठाकूरवर मोठी टीकेची झोड उठवण्यात आली होती.

Mrunal Thakur In Relation With South Superstar Dhanush: अगदी लो बजेट मूव्ही असूनही सुपरडुपर हिट करणारी अभिनेत्री म्हणजे, मृणाल ठाकूर (Mrunal Thakur). मराठमोळ्या मृणाल ठाकूरच्या सौंदर्यावर अनेकजण फिदा आहेत. मृणाल सौंदर्यासोबत तिच्या अभिनयानंही अनेकांना घायाळ करते. तिचे लो बजेट मूव्हीसुद्धा 100 कोटींहून अधिक कमाई करतात. नुकताच मृणाल ठाकूरचा अजय देवगणसोबतचा 'सन ऑफ सरदार 2' सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसून आलेली. सिनेमा रिलीज व्हायच्या आधीपासूनच त्यातील गाण्याच्या डान्स स्टेपमुळे चर्चेत आलेला. तर, अजय देवगण आणि मृणाल ठाकूरवर मोठी टीकेची झोड उठवण्यात आली होती. अशातच याव्यतिरिक्त आणखी एका कारणामुळे मृणाल ठाकूर चर्चेत आली आहे.
अलिकडेच मृणाल ठाकूरचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये ती रजनिकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्या रजनिकांतचा (Aishwarya Rajinikanth) घटस्फोटीत पती आणि साऊथ सुपरस्टार धनुषच्या (Sout Actor Dhanush) हातात हात धरुन पार्टी एन्जॉय करताना दिसत होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाला. तेव्हापासून मृणाल आणि धनुष एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. अशातच आता मृणाल ठाकूरनं यावर मौन सोडलं आहे. तसेच, व्हायरल व्हिडीओमागचं सत्यही मृणालनं सांगितलं आहे.
धनुषसोबत रिलेशनशिपमध्ये? मृणाल ठाकरूनं अखेर मौन सोडलं
ओन्ली कॉलिवूडशी बोलताना अभिनेत्री मृणाल ठाकूरनं तमिळ सुपरस्टार धनुषसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. धनुषसोबतच्या डेटिंगच्या चर्चा म्हणजे, अफवा असल्याचंही तिनं सांगितलं आहे. अफवांवर प्रतिक्रिया देताना मृणाल ठाकरू सर्वात आधी खळखळून हसली आणि म्हणाली की, तिच्यात आणि धनुषमध्ये मैत्रीपेक्षा जास्त काहीच नाही. ती म्हणाली की, "धनुष माझा फक्त एक खूप चांगला मित्र आहे..." अफवांना नकार देत तिनं सांगितलं की, तिला हे खूप 'गमतीशीर' वाटलं, आम्हा दोघांमध्ये डेटिंगसारखे काहीही नाही..., असंही मृणालनं सांगितलं.
पुढे बोलताना, मृणाल ठाकूरनं 'सन ऑफ सरदार 2' च्या स्क्रीनिंगमध्ये धनुषच्या उपस्थितीबद्दलही सांगितलं. ती म्हणाली की, तो तिच्या निमंत्रणावर स्क्रीनिंगला आला नव्हता. धनुष 'सन ऑफ सरदार 2'च्या कार्यक्रमात पोहोचला होता. याबाबत कोणीही गैरसमज करू नये. अजय देवगननं धनुषला आमंत्रित केलं होतं. यासोबत, तिनं धनुषला डेट करण्याच्या अफवांवर स्पष्ट नकार दिला.
मृणाल आणि धनुषच्या डेटिंगच्या अफवा कशा सुरू झाल्या?
अभिनेता धनुषनं मृणाल ठाकूरच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती आणि आता त्या पार्टीतून एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये धनुष मृणाल ठाकूरचा हात धरून गप्पा मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओनंतर मृणाल ठाकूर आणि धनुषच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
दरम्यान, दोघांच्याही वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, धनुष आता कृती सेननसोबत 'तेरे इश्क में' चित्रपटात दिसणार आहे आणि हा चित्रपट 28 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर, मृणाल ठाकूर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटात दिसून आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























