Jailer Twitter Review : फॅन्सचा नुसता कल्ला, शिवाजी'नंतरचा रजनीकांतचा हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ; जा जाणून घ्या ‘जेलर’चा ट्विटर रिव्ह्यू
नुकताच आज त्याचा 'जेलर' चित्रपट रिलीज झाला आहे. लोकांनी अक्षर: चित्रपटाला डोक्यावर उचलून धरले आहे. हा चित्रपट तमिळ भाषेतील असून तेलुगू आणि हिंदीमध्ये डब करण्यात आला आहे.
Jailer Twitter Review : दाक्षिणात्य चित्रपट म्हटलं की, पहिल्यांदा डोळ्यासमोर नाव येते ते म्हणजे सुपरस्टार रजनीकांतचे. रजनीकांतचे फॅन फाॅलोविंग जबरदस्त आहे. नुकताच आज त्याचा 'जेलर' चित्रपट रिलीज झाला आहे. लोकांनी अक्षरश: चित्रपटाला डोक्यावर उचलून धरले आहे. हा चित्रपट तमिळ भाषेतील असून तेलुगू आणि हिंदीमध्ये डब करण्यात आला आहे. रजनीकांत यांच्या फॅन्सनी अक्षरक्ष: थिएटरमध्ये गर्दी केली आहे. त्यामुळे या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगलेली आहे. ट्विटरवर या चित्रपटाची जोरात चर्चा आहे. रजनीकांत यांचे चाहते हे आपल्या चित्रपट पाहून झाल्यावर प्रतिक्रिया ट्विटरवर पोस्ट करायला सुरूवात केली आहे. साऊथचा गॉड म्हटल्या जाणाऱ्या रजनीकांत यांच्या करिअरमधील हा 169 वा चित्रपट आहे. रजनीकांतने तब्बल 2 वर्षानंतर जबरदस्त कमबॅक केले आहे. एकंदरीत पाहाता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणार असल्याचे चित्र दिसत आहे.
ट्विटरवर एका यूजरने 'जेलर'चा रिव्ह्यू देत 'जेलर हा चित्रपट ब्लॉकबस्टर आहे. अशा प्रकारे कमबॅक करायला हवा. रजनीकांतचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरणार असल्याचा मी साक्षीदार आहे' असे ट्विट केले आहे.
#Jailer - BLOCKBUSTER
— AmuthaBharathi (@CinemaWithAB) August 10, 2023
This is how a comeback has to be given #Nelson👊💥
Going to witness Superstar #Rajinikanth's massive potential on Box office 🌟💯
दुसऱ्या एका यूजरने 'हा सिनेमा ब्लास्ट आहे. रजनीकांतने त्याची कॉमेडी, थ्रील आणि थलायवा मूव्हमेंटने चित्रपटाला चार चाँद लावले आहेत. शिवाजीनंतरचा रजनीकांतचा सर्वोत्कृष्ट सिनेमा' असे म्हटले आहे.
#Jailer is a blast ! Career best for Nelson.
— Kousik Karthikeyan (@kousik23) August 10, 2023
He nails the screenplay with exact proportions of Fun, thrill and Thalaivar moments...
It's the best mass film since Sivaji ..
It's a festival 🔥🔥🔥🔥🔥
Industry hit!!!!
Thalaivara ah ipadi paathadhu podhum. Life time…
नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित आणि सन पिक्चर्सच्या बॅनरखाली बनलेल्या 'जेलर' या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबतच मोहनलाल, जॅकी श्रॉफ, रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन आणि योगी बाबू या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
एका वृत्तानुसार, चेन्नई आणि बंगळुरूमधील काही कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्यांसाठी 10 ऑगस्ट रोजी 'जेलर'च्या रिलीजच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. जेलर चित्रपटाच्या माध्यमातून रजनीकांत हे दोन वर्षांच्या ब्रेकनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहेत.
'जेलर' मधील गाण्यांना मिळाली पसंती
'जेलर' या चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या चित्रपटामधील कावाला हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड झालं. या गाण्यावरील रिल्सचे व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांनी तसेच सेलिब्रिटींनी शेअर केले. या गाण्यामधील तमन्नाच्या डान्सला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळाली. तसेच रथामारे,जुजुबी ही गाणी देखील या चित्रपटांमध्ये आहेत.
'जेलर' सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका अनुभवायला मिळणार आहे. रजनीकांत Annaathee या सिनेमात शेवटचा दिसला होता. त्यामुळे त्याचे चाहते आता 'जेलर' सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते आणि आज फॅन्सच्या आतुरतेला पूर्णविराम लागला आहे.