एक्स्प्लोर

Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत स्वामी सांगणार, 'योग्य संगतीचा परिणाम'; घडणार अद्भूत चमत्कार!

Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: विंचू आणि नंतर चिमणीसोबत घडणाऱ्या दोन रहस्यमय प्रसंगांतून स्वामी 'संगती'चा खरा अर्थ उलगडून दाखवतात चांगल्या संगतीतून होणारे पुण्य आणि चुकीच्या संगतीतून होणारा अधःपात हे दोन्ही अनुभवातून स्पष्ट करतात.

Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत प्रत्येक भागासोबत उलगडत चाललेला स्वामींचा दिव्य संदेश या आठवड्यात आणखी गूढ, भावनिक आणि विचार करायला लावणारा ठरणार आहे. स्वामींच्या शिकवणीतून 'योग्य संगतीचा परिणाम' या अर्थपूर्ण विषयावर प्रकाश पडताना प्रेक्षकांना अध्यात्मिक अनुभूती देणारी कथा पाहायला मिळेल.

गेल्या चार वर्षं घरापासून दूर असलेला भाऊ खरंतर एका चुकीच्या संगतीमुळे कुटुंबाला सोडून गेला आहे. त्याचे आई-वडील आणि त्याची बहीण, सगळे त्याच्या परत येण्यासाठी आतुर आहेत. पण, कितीही प्रयत्न करूनही तो परत येत नाही. अशा परिस्थितीत, एक बहीण तिच्या कुटुंबाचे झालेले हाल पाहते आणि वचन देते की ती कोणत्याही परिस्थितीत तिच्या भावाला परत आणेल.

प्रश्न असा आहे की, एका खलनायकी जोडप्याने पथभ्रष्ट केलेल्या भावाला ती एकटी बहीण योग्य मार्गावर कसे आणणार? तिच्या प्रेम, दृढनिश्चय आणि स्वामी भक्तीच्या जोरावर ती या खडतर प्रवासात यशस्वी होईल का? ही कथा आपल्याला एका तुटलेल्या नात्याला पुन्हा जोडण्याच्या तिच्या प्रवासाची रंजक गोष्ट सांगेल. यात स्वामी तिला नाते पुन्हा जोडण्यासाठी कसा मोलाचा सल्ला देणार? कशी तिला दिशा दाखवणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

स्वामी स्थानात गोपाळबुवा स्वामींची पाद्यपूजा करत असताना 'योग्य संगतीचा परिणाम' या विषयावर मार्गदर्शन मागतात. आणि यानंतर घडणाऱ्या घटनांची मालिकाच प्रेक्षकांना थक्क करणारी ठरते. स्वामींच्या आज्ञेनं गोपाळबुवा एका विंचवाला प्रश्न विचारतात आणि त्यानंतर घडतं एक अद्भुत चमत्कार... विंचू आणि नंतर चिमणीसोबत घडणाऱ्या दोन रहस्यमय प्रसंगांतून स्वामी 'संगती'चा खरा अर्थ उलगडून दाखवतात चांगल्या संगतीतून होणारे पुण्य आणि चुकीच्या संगतीतून होणारा अधःपात हे दोन्ही अनुभवातून स्पष्ट करतात.

दरम्यान, शारदाच्या कुटुंबातही भावनिक घडामोडी घडत आहेत. नरेशच्या वागण्यातले बदल, त्याचं खोटं बोलणं आणि त्यामागचं गूढ हे सर्व हळूहळू शारदा आणि विद्याधर यांच्या नजरेस पडतं. शारदा भावासाठी सर्वस्व पणाला लावते, पण तिलाही न समजणाऱ्या एका संकटाची चाहूल लागते. दुसरीकडे, स्वामी अर्थपूर्ण संदेश देताना म्हणतात "पेल्यातलं वादळ वेळीच ओळखावं, नाहीतर त्याचं नियंत्रण कठीण होतं." या वाक्यानं आगामी घटनांवर गूढ छाया निर्माण होते. स्वामींच्या शिकवणीतून भक्तांना मिळणारा आत्मबोध, एका बहिणीचा भावासाठीचा संघर्ष आणि चुकीच्या संगतीमुळे निर्माण झालेलं नात्यातले वादळ या सगळ्याचा संगम प्रेक्षकांना या आठवड्यातील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. कित्येक कुटुंबांना आपलीशी वाटणारी ही गोष्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

59 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला 'तो' शो सुरू होताच लोक करायचे टीव्ही बंद; तरीही बनलेला नंबर-1!
59 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला 'तो' शो सुरू होताच लोक करायचे टीव्ही बंद; तरीही बनलेला नंबर-1!
Maniesh Paul Paranormal Experiences: 'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
Thalapathy Vijay Son Jason Sanjay: ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
Netflix Web Series Love: डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल
डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल

व्हिडीओ

Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Rupali Patil Thombare: हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
Manoj Jarange Patil and Ajay Baraskar: मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
Smriti Mandhana: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Video: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Embed widget