एक्स्प्लोर

Jai Jai Swami Samarth:  स्वामींच्या लीलेसमोर मार्तंडचा अहंकार होणार चक्काचूर! 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत नवा ट्वीस्ट

मार्तंडाने "हरिप्रियाचे लग्न विठ्ठलाशी लावून दाखवाच" असे जे आव्हान दिले होते, त्याला स्वामी आपल्या खास शैलीत उत्तर देणार आहेत.

Jai Jai Swami Samarth: कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' (Jai Jai Swami Samarth) ही मालिका सध्या अत्यंत रंजक आणि दैवी वळणावर आली आहे. भक्ती आणि शक्ती यांच्यातील संघर्षात आता एक असा चमत्कार घडणार आहे, ज्याची कल्पनाही प्रेक्षकांनी केली नसेल. स्वामींनी दिलेल्या "अशक्यही शक्य करतील स्वामी" या वचनाची प्रचिती आता हरिप्रिया आणि सावळ्याच्या निमित्ताने संपूर्ण अक्कलकोटला येणार आहे. एका बाजूला मार्तंड आणि अधिकाऱ्याचा कुटील डाव, तर दुसऱ्या बाजूला स्वामींची अगाध लीला; या द्वंद्वात आता सत्याचा विजय कसा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

स्वामी उभे करणार अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली साक्षात 'प्रति-पंढरपूर' 

मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की, मार्तंड आणि केशव मिळून हरिप्रियाला अधिकाऱ्याशी लग्न करण्यास भाग पाडतात, पण तसे घडत नसल्यामुळे हरिप्रियाला आव्हान देतात की ती जर पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घेऊ शकली, तर तिचे लग्न स्वामी म्हणतील त्या व्यक्तीसोबत करणार. त्यांच्या कुटील खेळीचा भाग म्हणून हरिप्रियाला पंढरपूरला जाण्यापासून रोखण्यासाठी मार्तंड आणि त्याचे साथीदार सर्व मर्यादा ओलांडणार. खोट्या आरोपांखाली तुरुंगवास आणि वाटेत पेरलेली संकटे यामुळे हरिप्रियाचा प्रवास थांबला असे वाटत असतानाच, स्वामी स्वतः मैदानात उतरणार आहेत. "भक्त विठ्ठलापर्यंत पोहोचू शकला नाही, तर विठ्ठलालाच भक्तापाशी यावे लागेल," या उक्तीप्रमाणे स्वामी अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली साक्षात 'प्रति-पंढरपूर' उभे करणार आहेत. मार्तंडाने "हरिप्रियाचे लग्न विठ्ठलाशी लावून दाखवाच" असे जे आव्हान दिले होते, त्याला स्वामी आपल्या खास शैलीत उत्तर देणार आहेत.

प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच

हा विशेष भाग केवळ चमत्कारापुरता मर्यादित नसून, तो अहंकारी मार्तंड आणि कपटी अधिकारी यांच्यासाठी एक मोठा धडा ठरणार आहे. स्वामी आपल्या दिव्य शक्तीने केवळ हरिप्रियाची स्वप्नपूर्तीच करणार नाहीत, तर सावळ्याला त्याचे गमावलेले आयुष्य पुन्हा मिळवून देऊन एक सामाजिक संदेशही देतील. कपट आणि लबाडीने रचलेला लग्नाचा मांडव आता भक्तीच्या सोहळ्यात कसा बदलतो आणि स्वामींच्या एका कृपेने मार्तंडाची सर्व कारस्थाने कशी धुळीला मिळतात, हे पाहणे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mithun Chakraborty Sridevi Affair Clim: 'त्यावेळी तीन महिने नवरा-बायकोप्रमाणे एकत्र राहिलेले...'; श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्तींबाबत चक्रावणारा दावा
'त्यावेळी तीन महिने नवरा-बायकोप्रमाणे एकत्र राहिलेले...'; श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्तींबाबत चक्रावणारा दावा
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Jeetendra Nephew Award Winning Director: एकता कपूरचा भाऊ 'हा' अवॉर्ड विनिंग डायरेक्टर, अभिनयात ठरला फ्लॉप, मग बनवली सुपरहिट 'कल्ट क्लासिक फिल्म', ओळखलं का कोण?
एकता कपूरचा भाऊ 'हा' अवॉर्ड विनिंग डायरेक्टर, अभिनयात ठरला फ्लॉप, मग बनवली सुपरहिट 'कल्ट क्लासिक फिल्म', ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Embed widget