एक्स्प्लोर

Marathi Movie : ‘जाहीर झालं जगाला…,’ अजय- अतुल यांच्या संगीताची जादू, येक नंबर सिनेमातलं गाणं रिलीज

Marathi Movie : येक नंबर या सिनेमातलं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून अजय-अतुल यांच्या संगीताची जादू प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवयाला मिळतेय.

Marathi Movie :  झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत, सह्याद्री फिल्म्स निर्मित 'येक नंबर' (Yek Number) चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. 'ती' करारी नजर,  'तो' कणखर आवाज यांनी चित्रपटाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले असतानाच आता या चित्रपटातील पहिलेवहिले रोमँटिक गाणे प्रदर्शित झाले आहे. 

'जाहीर झालं जगाला...' असे बोल असणारे हे गाणं धैर्य घोलप आणि सायली पाटीलवर चित्रित करण्यात आले आहे. गुरु ठाकूर यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गाण्याला श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांनी आपल्या गायकीने चारचांद लावले आहेत. अजय -अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या या जबरदस्त गाण्याला स्टॅनली डिकोस्टा यांचे नृत्य दिग्दर्शन लाभले आहे. तेजस्विनी पंडित, वरदा साजिद नाडियाडवाला, बवेश जानवलेकर  'येक नंबर' चित्रपटाचे निर्माते आहेत. 

सिनेमाची दुसरी बाजू उत्कंठा वाढवणारी
चित्रपटाची घोषणा, पोस्टर, टिझर पाहाता हा एक ॲक्शनपट असल्याचा अंदाज आतापर्यंत प्रेक्षकांना आला असेलच. परंतु नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्यावरून या चित्रपटात प्रेक्षकांना सुंदर प्रेमकथाही पाहायला मिळणार आहे. या गाण्यात धैर्य प्रथमच एका वेगळ्या अंदाजात दिसत असून सायली -धैर्यची कमाल केमिस्ट्री यातून पाहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या स्वप्नातील प्रेमकहाणी असावी, इतक्या सुंदररित्या हे गाणे चित्रित करण्यात आले असून प्रत्येक प्रेमीयुगुलाला जादुई नगरीची सफर घडवणारे हे गाणे आहे. चित्रपटाची ही दुसरी बाजूही प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी आहे. 

अजय अतुल यांनी काय म्हटलं? 

अजय-अतुल यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, या गाण्यातून मनातील प्रेमभावना हळुवार व्यक्त होणे खूप गरजेचे होते. त्यानुसार गुरु ठाकूर यांनी या गाणं लिहिलं. त्याचंप्रमाणे आम्हीही थोडं वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला आहे.उत्तम बोल, तरलता, आवाज, नृत्य दिग्दर्शन लाभल्याने हे गाणे अतिशय उत्कृष्ट बनले आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाच्या भावना व्यक्त करणारे हे गाणे आहे.''

गुरु ठाकुर यांनी काय म्हटलं? 

गुरु ठाकूर यांनी म्हटलं की,  'मुळात चालीत दडलेला रोमान्स केवळ शब्दरूपाने कागदावर मांडायचे काम मी केले आहे. अतिशय आनंददायी असा अनुभव होता आणि अजय अतुल सोबत काम करताना प्रत्येकवेळी ही टीमवर्कची जादू अनुभवायला मिळते आणि मला खात्री आहे, गाणे ऐकताना रसिकही ती अनुभवतील.'  

View this post on Instagram
 
A post shared by T-Series (@tseries.official)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 : अखेर प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होणार, 'अरबाज की निक्की' घराबाहेर कोण जाणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
ISRO SpaDeX Docking : इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaDoctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलंDhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
ISRO SpaDeX Docking : इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
Nashik News : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
8 th Pay commission: मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
Embed widget