एक्स्प्लोर

Raja Shivaji: 'राजा शिवाजी' चित्रपट पाहिल्यानंतर IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील भारावून गेले, पोस्ट व्हायरल, रितेश देशमुख कमेंट करुन म्हणाला..

IPS Officer Vishwas Nangre Patil On 'Raja Shivaji' Film: आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमाचं कौतुक केलं.

IPS Officer Vishwas Nangre Patil review on 'Raja Shivaji' Film: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित आणि अभिनीत 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) हा सिनेमा 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाची केवळ महाराष्ट्रात नसून, देशभरात चर्चा सुरू आहे. या सिनेमात मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. या सिनेमात सलमान खानच्या भूमिकेविषयी प्रचंड चर्चा झाली. सलमान खानने या ऐतिहासिक सिनेमात जीवा महाले यांची भूमिका साकारली. जीवा महाले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक होते. या चित्रपटाला सध्या प्रेक्षकवर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.  या सिनेमाचं कलाकारांपासून इतर क्षेत्रातील दिग्गजांनी कौतुक केलं. दरम्यान, या चित्रपटाविषयी राज्याचे प्रसिद्ध आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्यांच्या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची पोस्ट व्हायरल (IPS Officer Vishwas Nangre Patil on Raja Shivaji Film)

आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी 'राजा शिवाजी' चित्रपटाविषयी एक भारावून टाकणारी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चित्रपटाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच या ऐतिहासिक सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. या सिनेमाविषयी विश्वास नांगरे पाटील म्हणतात, 

'राजा शिवाजी : एक अजरामर कलाकृती. महाराष्ट्र दिनी ज्वलंत, धगधगता शिव छत्रपतींचा बाल, युवा अवस्थेतील दैदिप्यमान कालखंड या चित्रपटात पाहायला मिळाला. हा समर पट पाहताना अंगातील अनु रेणू स्फुल्लिंगीत होतात , रग पेटते , रक्त सळसळते. संवाद रोमांच उभे करतात. वीर रसातील छत्रपतींची स्तुती ही सतत गुंजारव करते. इतिहासाचा सखोल अभ्यास करून यातले प्रसंग उभे केलेले दिसतात. पूर्ण वेळ तुम्ही तुमची पाठ खुर्चीला टेकवू शकत नाही. 

सतराव्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्र यवनांच्या अंमलाखाली पिसत होता. महिलावर अत्याचार , हत्या, जबरदस्ती धर्म परिवर्तन आम बात झाली होती. अहमदनगरच्या निजामशाहने खुलेआम जिजाऊ मातेचे पिता, काका आणि भावांची हत्या केली. फलटणचे शासक बालाजी निंबालकरांचे  बीजापुरच्या सुल्तानाने धर्म परिवर्तन केले होते. धर्मपरिवर्तन, गौहत्या और अत्याचारांच्या घटनांनी माँ जिजाऊचे हृदय पिळवटून निघत होते. त्या विचार करायच्या, 'या अन्यायी राजवटीचा अंत का होऊ शकत नाही. माझ्या पुत्रामध्ये या राक्षसी वृत्तीला थोपवण्याचे सामर्थ्य येऊ शकेल काय!'... आणि मग झंझावात उभा राहीला. शिवजन्मापूर्वी आदिलशाहने पुण्याला गाढवाच्या नांगराने खणले होते आणि शिवरायांनी त्याच भूमीत सुवर्णनांगर लावून पावन केले. सुजलाम सुफलाम केलं. गनिमी काव्याने गनीमास नामोहरम केले. 

शिवरायांची जडणघडण, त्यांचे माँ जिजाऊं, पिता शहाजी राजे आणि बंधू संभाजीशी असणारे भावनिक नाते, त्यांचे युद्ध कौशल्य, रयतेवरची त्यांची निष्ठा, सवंगडी मावळे, राजकारण, युद्ध नीती, कूटनीती आणि शेवटी खानाचा खात्मा! सगळं कसं अप्रतिम, भव्य दिव्य! अजय अतुलचे संगीत तर अजेय !! शिवाजी महाराज आणि शंभू राजे गेल्यानंतर महाराष्ट्र औरंगजेबासाठी सहज होता का ? नाही तर राजा शिवाय हा महाराष्ट्र बलाढ्य मोगली सत्तेसमोर एक दोन नाही २५ वर्षे ठाम उभा राहिला. बेदरकारपणे भिडला आणि लढला ! कारण शिवरायांनी स्थापन केलेले राज्य हे भोसल्यांचे नव्हते, एकही किल्ल्याचा सातबारा राजांच्या नावावर नव्हता. हे हिंदवी स्वराज्य होते , रयतेचे राज्य होते. हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा होती. या स्वराज्याची संकल्पना रितेश देशमुख यांनी दमदार स्वरूपात नव्या पिढीला समजावून सांगितली आहे. या टोलेजंग कलाकृतीला भरघोस प्रतिसाद आणि प्रेम मिळेल, हे निश्चित ! जगदंब जगदंब !!'

रितेश देशमुखकडून विश्वास नांगरे पाटील यांचे आभार (Riteish Deshmukh on IPS Officer Vishwas Nangre Patil Post)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vishwas Nangre Patil (@vishwasnangrepatil)

आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करुन कौतुक केलं. अभिनेता रितेश देशमुखनेही कमेंट करुन त्यांचे आभार मानले आहेत.  विश्वास नांगरे पाटील यांच्या पोस्टवर रितेश देशमुखने, 'आपले खूप खूप आभार @vishwasnangrepatil जी..' अशी कमेंट केली आहे.

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तमरित्या सुरुवात केली आहे. दरम्यान, विकेंडला हा सिनेमा किती कोटींची कमाई करेल, हे लवकरच समोर येईल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी झाला बाबा, दुसऱ्या पत्नीनं दिली गुडन्यूज; सेलिब्रिटींकडून शुभेच्छा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
Aus vs Ban 2nd Test Mitchell Starc : मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
Ind vs Sl 2nd Test : पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
Embed widget