एक्स्प्लोर

Pavandeep Rajan: 'हात-पाय फ्रॅक्चर, महिनाभर अंथरुणाला खिळला...'; इंडियन आयडल विनरचा झोपेतच भीषण अपघात, देवाच्या कृपेनंच वाचले प्राण

या शोमुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढली. मात्र, करिअरच्या शिखरावर असतानाच 2025 मध्ये त्याच्यावर मोठं संकट आलं.

Indian Idol Winner Pavandeep on Accident: इंडियन आयडॉल 12 चा विजेता आणि लोकप्रिय गायक पवनदीप (Pavandeep Rajan) पुन्हा चर्चेत आलाय.  गेल्या वर्षी एका भीषण अपघातातून बचावल्यानंतर  पवनदीपने त्याच्यासोबत घडलेल्या भीषण अपघाताबद्दल खुलासा केला आहे. 2025 मध्ये झालेल्या या गंभीर अपघातात त्याच्या दोन्ही पायांना आणि हातांना मोठी दुखापत झाली होती.  झोपेत असतानाच हा अपघात झाल्यामुळे त्याला काहीही करता आलं नाही. अपघातानंतर पवनदीप अक्षरशः अंथरुणाला खिळला होता. मात्र, प्रचंड इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारांमुळे तो या कठीण काळातून बाहेर पडू शकला, असं त्यानं सांगितलं. (Indian Idol 12 Winner)

पवनदीप राजन आज संगीत क्षेत्रातील एक ओळखले जाणारे नाव आहे. ‘इंडियन आयडल’ जिंकण्यापूर्वीही तो उत्तराखंडच्या संगीतविश्वात प्रसिद्ध होता. या शोमुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढली. मात्र, करिअरच्या शिखरावर असतानाच 2025 मध्ये त्याच्यावर मोठं संकट आलं.

अपघाताच्या रात्री नेमकं काय घडलं?

गायक आणि संगीतकार सलीम मर्चंट यांच्या पॉडकास्टमध्ये पवनदीपने त्या अपघाताची सविस्तर माहिती दिली. तो म्हणाला, “एका शोसाठी ऑफर आली होती. आम्ही दिवसा निघणार होतो, पण मी संध्याकाळी निघायचं ठरवलं, जेणेकरून सकाळपर्यंत पोहोचू. पहाटे 3 वाजताच्या सुमारास आमची गाडी एका उभ्या ट्रकला जाऊन धडकली. मी त्या वेळी झोपलेलो होतो, त्यामुळे नेमकं काय झालं हे कळलंच नाही. उठल्यावर पाहिलं तर माझे दोन्ही पाय आणि एक हात फ्रॅक्चर झाले होते. ड्रायव्हरला झोप लागली होती आणि त्याने गाडी ट्रकमध्ये घातली.”

पवनदीपने सांगितलं की, अपघातानंतर तो गाडीचं दारही उघडू शकत नव्हता. त्याचा एकच हात काम करत होता. त्याने बाहेर काढण्यासाठी मदत मागितली. दरम्यान, गाडीला आग लागली होती, मात्र त्याआधीच त्याला बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

देवाच्या कृपेनंच वाचले प्राण

या अपघातानंतर पवनदीप महिनाभर हलूही शकत नव्हता. आता तो पूर्णपणे बरा झाला असून, चालण्याचं महत्त्व त्याला नव्याने जाणवलं आहे. कठीण प्रसंगात न खचता सकारात्मक राहण्याचा सल्ला देत तो म्हणाला, दुःखाच्या काळातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अलीकडेच त्याने ‘इंडियन आयडल 16’मध्येही हा अनुभव पुन्हा सांगितला होता. त्याची ही जिद्द ऐकून विशाल ददलानी  यांनी त्याचं कौतुक केलेलं, तर करिश्मा कपूरही भावूक झालेली. सध्या पवनदीप कॉन्सर्ट्स आणि म्युझिक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असून त्याची गाणी चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget