उल्लू, अल्ट बालाजीसह बोल्ड कंटेट दाखवणाऱ्या 25 APP वर बंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Indian Government banned Ullu and ALTT ALT Balaji : अश्लील कंटेटमुळे भारत सरकारने उल्लू, एएलटीटी आणि इतर स्ट्रीमिंग अॅप्सवर बंदी घातली आहे. या निर्णयामागील कारण जाणून घ्या.

Indian Government banned Ullu and ALTT ALT Balaji : उल्लू, ALTT, देसीफ्लिक्स, बिग शॉट्स अशा बोल्ड कंटेट पुरवणाऱ्या 25 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे, याबाबतचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलाय. सरकारने हा निर्णय अश्लील आणि लैंगिक स्वरूपाच्या कंटेंटविरोधात आखण्यात आलेल्या धोरणांतर्गत घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला (MeitY) या अॅप्सविरोधात अनेक नागरीक आणि संघटनांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
अश्लील कंटेंटबाबत तक्रारी समोर आल्यानंतर प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. चौकशी दरम्यान असे लक्षात आले की, कामुक वेब सीरिजच्या नावाखाली खुलेआम अश्लील कंटेंटचे प्रसारण केले जात होते. सरकारने आढळून आणले की, 18 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी असलेले हे OTT चॅनेल्स, आयटी नियम 2021 आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 292/293 चे उल्लंघन करत होते.
भारतात अश्लीलतेविषयीचे कायदे काय सांगतात?
भारतीय कायद्यानुसार अश्लील कंटेंट अशी गोष्ट मानली जाते जी सार्वजनिक नैतिकतेला धक्का पोहोचवते, विशेषतः जर तो कंटेंट अल्पवयीन मुलांसाठी सहज उपलब्ध असेल तर. आयटी कायद्याच्या कलम 67 आणि 67A अंतर्गत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील किंवा लैंगिक स्वरूपाच्या कंटेंटच्या प्रसारणावर आणि प्रकाशनावर बंदी आहे. त्याशिवाय IPC च्या कलम 292 आणि 293 अंतर्गत अश्लील साहित्य आणि कंटेंटचे वितरण आणि सार्वजनिक प्रदर्शन यावर दंडात्मक तरतुदी आहेत. तसेच बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सर्व डिजिटल स्वरूपाच्या कंटेंटवर POCSO कायद्यांतर्गत शिक्षा होऊ शकते.
कोणत्या अॅपवर केंद्र सरकारने बंदी घातली?
Ullu
ALTT (ALTBalaji)
Desiflix
Big Shots
Boomex
MoodX
NeonX VIP
Mojflix
Triflicks
Hulchul App
HotX VIP
Uncut Adda
Besharams
Xtramood
Chikooflix
Fugi
Nuefliks
Prime Play
Hunters
Rabbit Movies
Voovi
X Prime
Yessma
Dreams Films
Hot Shots VIP
OTT प्लॅटफॉर्म्सवर नियंत्रणाचा अभाव
OTT प्लॅटफॉर्म्सना स्वनियमनाचा अधिकार दिला गेला होता, परंतु काही प्लॅटफॉर्म्सनी या अधिकाराचा गैरवापर केला आणि मर्यादा ओलांडल्या. त्यामुळे सरकारला थेट हस्तक्षेप करावा लागला.
MIB ने अश्लीलता पसरवणाऱ्या 25 अॅप्सवर बंदी घातली
MIB (माहिती आणि प्रसारण मंत्रालय) ने अश्लीलता पसरवणाऱ्या 25 अॅप्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या अॅप्समध्ये ALTT, ULLU, बिग शॉट्स अॅप, देसिफ्लिक्स, बूमेक्स, नवरसा लाइट, गुलाब अॅप, कंगन अॅप, बुल अॅप, जलवा अॅप, वॉव एंटरटेनमेंट, लूक एंटरटेनमेंट, हिट प्राइम, फेनेओ, शोएक्स, सोल टॉकीज, अड्डा टीव्ही, हॉटएक्स VIP, हलचल अॅप, मूडएक्स, निऑनएक्स VIP, शोहिट, फुगी, मोजफ्लिक्स आणि ट्रायफ्लिक्स यांचा समावेश आहे. हे सर्व अॅप्स आयटी कायदा आणि संबंधित कायद्यांचे उल्लंघन करत होते.
अवैध जुगार वेबसाइट्स आणि मोबाइल अॅप्सवरही बंदी
सरकारने बुधवारी (23 जुलै 2025) संसदेत माहिती दिली की, 2022 ते जून 2025 या काळात 1,524 अवैध जुगार वेबसाइट्स आणि मोबाइल अॅप्सवर बंदी घालण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. या काळात सरकारने ऑनलाइन सट्टेबाजी, जुगार आणि गेमिंगशी संबंधित 1,524 ब्लॉकिंग निर्देश जारी केले आहेत. हे पाऊल अशा परदेशी ऑनलाइन जुगार प्लॅटफॉर्म्सविरोधात उचलले गेले आहेत. जे भारतीय कर नियम किंवा स्थानिक कायद्यांचे पालन न करता कार्यरत होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या























