(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune : 60 व्या राज्य नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून 'खानदानी' अव्वल
Pune : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून वलय नाट्य संस्था, पुणे या संस्थेच्या 'खानदानी' या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे
Pune : 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून वलय नाट्य संस्था, पुणे या संस्थेच्या 'खानदानी' या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे याबाबतची घोषणा केली आहे. खानदानी या नाटकाची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. दिग्दर्शन, नेपथ्य आणि प्रकाश योजना विभागातही खानदानी या नाटकाने बाजी मारली आहे.
स्वरगांधार संगीत व साहित्य प्रसार, पुणे या संस्थेच्या वास इज दास या नाटकास द्वितीय पारितोषिक आणि ध्यास परफॉर्रमिंग आर्टस्, पुणे या संस्थेच्या राक्षस या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.
तर पिंपरी चिंचवड या केंद्रातून 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत विषाद या नाटकाने बाजी मारली आहे. दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना, रंगभूषा आणि उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक ही पारितोषिके सुद्धा विषादला मिळाली आहेत.
आमचे आम्ही, पुणे या संस्थेच्या गावभाग या नाटकास द्वितीय पारितोषिक आणि निर्माण, पुणे या संस्थेच्या एक डोह अनोळखी या नाटकासाठी तृतीय पारितोषिक मिळालं आहे. समा ए सरहद या नाटकातील अनुष्का आपटेला अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालं आहे.
ही स्पर्धा 21 फेब्रुवारी 2022 ते 7 मार्च 2022 या कालावधीत पार पडली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांचा हा निकाल आहे. पुण्याच्या स्पर्धेचं परिक्षण सुरेश खानवीलकर, संजय टिपुगडे आणि अंजली केतकर यांनी केले आहे. तर पिंपरी -चिंचवड स्पर्धेचं परिक्षण मंदन दंडगे, संदीप देशपांडे आणि असावरी शेट्ये यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Rupa Dutta : अभिनेत्रीनं चक्क पाकिट मारलं, पोलिसांनी केली अटक
- Kangana Ranaut On The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' सिनेमावर 'पंगा क्वीन'ने दिली प्रतिक्रिया, म्हणाली...
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन राज्यांत करमुक्त
- Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' आता ओटीटीवर पाहता येणार; पाहा कोणत्या अॅपवर, कधी रिलीज होणार