IC 814 The Kandahar Hijack : 'आयसी 814: द कंधार हाईजैक' संदर्भात नेटफ्लिक्सचा मोठा निर्णय, वादंगानंतर केला 'तो' बदल
IC 814 The Kandahar Hijack : 'आयसी 814: द कंदहार हायजॅक' या वेब सीरिजच्या संदर्भात नेटफ्लिक्सने मोठा निर्णय घेतला असून बदल करण्यात आला आहे.
IC 814 The Kandahar Hijack : नेटफ्लिक्सवर (Netflix) नुकतीच प्रदर्शित झालेली 'IC 814:द कंदहार हायजॅक' (IC 814 The Kandahar Hijack) या सीरिजमुळे बराच वादंग निर्माण झाला होता. जनभावना दुखावल्याचा दावा करत भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेट हेडला समन्स देखील बजावण्यात आलं होतं. त्यानंतर आता नेटफ्लिक्सकडून महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
या वेब सीरिजमधील दोन दहशतवाद्यांच्या नावावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामध्ये दोन दहशतवाद्यांचं कोडवर्डमध्ये नाव भोला आणि शंकर अशी ठेवण्यात आली होती. पण हिंदू नावं का वापरली असा सवाल माहिती आणि प्रसारण विभागाकडून विचारण्यात आला होता. पण आता ही नावं बदलण्याचा निर्णय नेटफ्लिक्सने घेतला आहे.
नेटफ्लिक्सने काय म्हटलं?
नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेट हेड मोनिका शेरगिल यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं की, 1999 मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या विमानत घडलेल्या घटनेबाबत ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी ही सीरिज आहे. पण आता ओपनिंग डिस्क्लेमरमध्ये हायजॅकर्सची जी खरी नावं आहेत, ती समाविष्ट केलेली आहेत.
नेटफ्लिक्सने काय म्हटलं?
नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेट हेड मोनिका शेरगिल यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं की, 1999 मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या विमानत घडलेल्या घटनेबाबत ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी ही सीरिज आहे. पण आता ओपनिंग डिस्क्लेमरमध्ये हायजॅकर्सची जी खरी नावं आहेत, ती समाविष्ट केलेली आहेत.
आक्षेप काय होता?
या वेब सीरिजमध्ये विमान अपहरणाचा कट, भारतीय प्रवाशांच्या सुटकेसाठी तपास आणि गुप्तचर यंत्रणांची सुरू असलेली धडपड, दहशतवाद्यांचे कट, अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीची भूमिका दाखवण्यात आली आहे.
विमानाचा ताबा घेतल्यावर विमानातील दहशतवाद्यांनी आपली नावे सांगितली. हे दहशतवादी एकमेकांना शेफ, बर्गर, डॉक्टर, शंकर, भोला या नावांनी संबोधित होते. वेब सीरिजमध्ये शंकर, भोला या नावावर उजव्या विचारांच्या युजर्सने आक्षेप घेतला आहे. सोशल मीडियावर या वेब सीरिजवर बहिष्कार घालण्याचा ट्रेंड सुरू करण्यात आला होता. त्याची दखल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घेतली आहे.
Netflix updates disclaimer after contention raised on web series based on IC-814 hijack
— ANI Digital (@ani_digital) September 3, 2024
Read @ANI Story | https://t.co/h1NMHrw2t8#Netflix #disclaimer #IC814 #webseries pic.twitter.com/KEI0etw1aD