एक्स्प्लोर

Hruta Durgule On Motherhood: '...तेव्हाच मी आई होण्याचा निर्णय घेईन'; हृता दुर्गुळेचं मातृत्वाबाबतचं वक्तव्य चर्चेत

Hruta Durgule On Motherhood: मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळेनं मातृत्त्वाबाबत केलेलं वक्तव्य जोरदार चर्चेत आहे. तिशीतल्या अभिनेत्रीच्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Hruta Durgule On Motherhood: मराठी इंडस्ट्रीतील (Marathi Industry) काही मोजक्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या हृता दुर्गुळे (Hruta Durgule) सध्या तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. आगामी सिनेमात हृता लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचा लेक अभिनय बेर्डेसोबत (Abhinay Berde) झळकणार आहे. या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. आई-मुलाच्या नात्याची आजच्या परिभाषेतली संवेदनशील गोष्ट सांगणारा आगामी 'उत्तर' सिनेमा 12 डिसेंबरला रिलीज केला जाणार आहे. याच सिनेमात रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे आणि हृता दुर्गुळे झळकणार आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनवेळी दिलेल्या मुलाखतीत आई होण्यावर भाष्य केलं आहे. हृताचं हे वक्तव्य सध्या जोरदार व्हायरल होत आहे.  

अभिनेत्री हृता दुर्गुळे नेमकं काय म्हणाली?

मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळेनं नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना हृता दुर्गुळेनं अनेक गोष्टींवर भाष्य केलंय. हृता म्हणाली की, "माझी आई मला नेहमी म्हणते, तुला कळेल मुलगी झाल्यावर... आता मला त्याची जाणीव होतेय. मी कितीही लांब विमान प्रवास करत असले तरी ती जागी असते आणि मला वाटतं की, हे फक्त आईच करू शकते, दुसरं कोणीही नाही...".

पुढे बोलताना हृतानं सांगितलं की, ती वयाच्या सतराव्या वर्षापासून काम करतेय आणि तिला तिच्या घरातून त्यासाठी खूप पाठींबा मिळाला आहे. त्याबद्दल हृतानं तिच्या कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. याबाबत बोलताना हृतानं सांगितलं की, ""मी 17 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली, पण कधीच असं व्हायचं नाही की दरवाजा उघडल्यानंतर अंधार असायचा. माझी आई नेहमी थांबलेली असायची. माझे बाबा, भाऊ किंवा आता माझा नवरा... ते झोपतात. आता शूटिंगनंतर उशिरा घरी गेल्यानंतर मीच दार उघडून जाते. अशा खूप गोष्टी आहेत, ज्यासाठी मी तिचे आभार मानलेच नाहीत..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

...तेव्हाच मी आई होण्याचा निर्णय घेईन : हृता दुर्गुळे (Hruta Durgule Statement On Motherhood)

हृका दुर्गुळेनं मुलाखतीत बोलताना आई होण्याचाविचार करण्याबाबतही एक वक्तव्य केलं आहे. हृतानं अगदी स्पष्टपणे सांगितलं की, "आईच्या प्रेमाबद्दल कितीही बोललं तरी कमीच... मला आणि माझ्या आईला पिझ्झा खायला खूप आवडतो. जेव्हा आम्ही पिझ्झा घरी ऑर्डर करतो, तेव्हा सर्वांनी खाऊन झाल्यावर तो थोडा तरी उरतोच... मग तो उरलेला पिझ्झा आई नेहमी मला किंवा माझ्या भावाला खायला देते. ज्या दिवशी मला हे करावंसं वाटेल ना, त्या दिवशी मी आई होईन. कारण, स्वत:च्या आवडीची गोष्ट मुलाला द्यावी, हा नि:स्वार्थीपणा फक्त आईमध्येच असतो. हे मी कधीच करू शकत नाही..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Prajakta Mali Angry On Her AI Generated Photo: 'हे थांबवा, मी अजिबात...', प्राजक्ता माळी स्वतःचाच 'तो' फोटो पाहून चिडली, रागावली; नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
Nauheed Cyrusi on Miscarriages: 'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
Amol Kolhe On Savitribai Jyotiba Phule Serial: TV वरुन गाशा गुंडाळला, पण युट्यूबर येताच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं; 'सावित्रीबाई जोतीराव फुले'बाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
'टीआरपीपेक्षा प्रेक्षकांचं प्रेम महत्त्वाचं...'; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
Devoleena Bhattacharjee: पुराच्या पाण्यात अडकली आई, आजी-मावशीचं घर बुडालं; निसर्गाचा विध्वंस पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला रडू कोसळलं
पुराच्या पाण्यात अडकली आई, आजी-मावशीचं घर बुडालं; निसर्गाचा विध्वंस पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला रडू कोसळलं

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
Embed widget