एक्स्प्लोर

You Tube Channel Sevengers Success Story:  युट्युबवरील पहिल्याच व्हिडीओने कमाई कशी करावी? जाणून घ्या टीप्स

You Tube Channel Sevengers Success Story:  व्हिडीओ कंटेट चांगला असेल तर त्याला व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. व्हिडीओ, रील्समुळे अनेकांना लोकप्रियता मिळाली.

You Tube Channel Sevengers Success Story:  सोशल मीडियावर कॉमेडी व्हिडीओला मोठा वाव आहे. फनी रील्स आणि कॉमेडी शॉर्ट्सला लोकांची पसंती मिळते. व्हिडीओ कंटेट चांगला असेल तर त्याला व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. व्हिडीओ, रील्समुळे अनेकांना लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या SEVENGERS या कॉमेडी ग्रुपची चांगली हवा आहे. 
 
SEVENGERS ने यश कसे मिळवले?

SEVENGERS या युट्यूब चॅनेलला लाखो व्ह्यूज मिळतात आणि 17 मिलियनहून अधिक सब्सक्राईर्ब्स आहेत.  'जोश टॉकच्या शो'मध्ये या ग्रुपचे सदस्य असिफ उर्फ ​​मास्टरजी याने यश कसे मिळवले, याची संपूर्ण कहाणी सांगितली होती. आमचे व्हिडिओ केवळ विनोदी नसून सामान्य घरांची गोष्ट अतिशय खेळकर पद्धतीने सांगतो असेही त्याने म्हटले. 

नोकरी सोडली आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली

2021 मध्ये सुरू झालेल्या SEVENGERS च्या प्रवासाची कहाणी खूप रंजक आहे. वास्तविक आसिफने आपल्या भावासोबत याची सुरुवात केली होती. दोघांनीही ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केला होता आणि दोघांवरही नोकरी करण्यासाठी दबाव होता. 

आसिफने शोमध्ये सांगितले की, मला काहीतरी वेगळे करायचे होते. त्यामुळे नोकरी मिळाल्यानंतरही मी घरी खोटे बोललो की मला नाकारण्यात आले आहे. मात्र, त्याचा भाऊ नदीमने 15 हजार रुपयांच्या पगारावर नोकरी सुरू केली होती.

व्हिडीओसाठी घरातले मारायचे टोमणे

SEVENGERS च्या टीममध्ये 6 जणांची कोअर टीम आहे. या सगळ्यात महत्त्वाची भूमिका मास्टर आसिफ यांची आहे. आसिफ यांनी जवळपास 150 व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. 

या सगळ्या स्ट्रगलच्या काळात आसिफने सांगितले की,  स्ट्रगलच्या दिवसात मला घरातले लोक मला काय टाईमपास सुरू आहे, असा प्रश्न करायचे. त्यावेळी मी सांगायचो की या कामासाठी तुमच्याकडे हिंमत हवी, हवंतर तुम्ही व्हिडीओ बनवून दाखवा असे म्हटले. त्यानंतर माझ्या भावाने व्हिडीओ तयार करण्यास सुरुवात केली आणि आम्ही दोघांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. 

टिकटॉक बंदीचा बसला फटका....

मास्टरजी सीरिजचा व्हिडीओ व्हायरल होण्यास सुरुवात झाल्यानंतर SEVENGERS ला यश मिळू लागले. सुरुवातीच्या काळात मास्टरजी आसिफ सोबत त्याच्या भावासह चौघेजण असायचे. सुरुवातीला या टीमने टिकटॉकवर आपले व्हिडीओ अपलोड केले. टिकटॉकवर बंदी आणल्यानंतर त्याचा परिणाम SEVENGERS च्या युट्युब चॅनेलवरही झाला. काही काळासाठी हा चॅनल निष्क्रियदेखील झाला होता. 

SEVENGERS ने त्यानंतर आपल्या कंटेटमध्ये बदल केला. पु्न्हा एकदा युजर्सला कंटेट आवडू लागला. SEVENGERS च्या टीमला यश मिळू लागले. कलाकार प्रसिद्धीच्या झोतात आले. 

SEVENGERS च्या टीममध्ये सहाजणच का?

 SEVENGERS पाहणाऱ्यांच्या मनात अनेकदा प्रश्न निर्माण होतो की  या टीममध्ये सहाजणच का असतात. याबाबत मास्टर आसिफला विचारले असता त्याने सांगितले की, आमच्या टीममधील सातवी जागा ही आमच्या चाहत्यांसाठी आहे. त्यांनी SEVENGERS ला पूर्ण केले आहे. 

युट्यूबमधून पैसे कसे कमवावे?

आसिफने युट्यूबवर यश मिळवण्यासाठी आपल्या चाहत्यांना काही टिप्सही दिल्या आहेत. तुमची एडिटिंग चांगली असेल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. त्याशिवाय, युट्युबवर यशस्वी होण्यासाठी तुम्हाला प्रथम स्वतःला जाणून घेणे आवश्यक आहे. आसिफ यांनी असेही सांगितले की, जर तुम्हाला प्रसिद्ध यूट्यूबर बनायचे असेल तर तुम्हाला तुमच्यातील  लाजाळूपणा सोडावा लागेल, तरच तुम्ही येथे यशस्वी होऊ शकाल. YouTube वर यशस्वी होण्यासाठी कधीही कोणाचे चाहते बनू नका. तर त्यांच्याकडून शिका आणि त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये काय चांगले केले ते पाहा असेही आसिफने सांगितले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
Embed widget