एक्स्प्लोर

एका हॉलिवूड चित्रपटाची एन्ट्री अन् बॉलिवूडच्या सगळ्यांचंच धाबं दणाणलं; ‘धमाल 4’चा वेग मंदावला? बॉक्स ऑफिसवर मोठी उलथापालथ

वेलकम टू द जंगल’ आणि ‘अल्फा’ला मागे टाकल्यानंतर आता या चित्रपटासमोर ख्रिस्तोफर नोलनच्या ‘द ओडिसी’चे मोठे आव्हान उभे ठाकले आहे

Dhamaal 4 Box Office Collection: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ख्रिस्तोफर नोलनच्या हॉलिवूडपटाची जगभरातील चित्रपटगृहामध्ये एन्ट्री झालीय. ' द ओडिसी' प्रदर्शित होताच मोठमोठ्या बॉलिवूड चित्रपटांचे धाबे दणाणले आहेत. 10 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धमाल 4’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर आठ दिवस पूर्ण झाले आहेत. ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘अल्फा’ला मागे टाकल्यानंतर आता या चित्रपटासमोर ख्रिस्तोफर नोलनच्या ‘द ओडिसी’चे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. शुक्रवारचे बॉक्स ऑफिस आकडे समोर आले असून, आठव्या दिवशी ‘धमाल 4’ने किती कमाई केली, ते जाणून घेऊया.

‘द ओडिसी’चा ‘धमाल 4’च्या कमाईवर किती परिणाम?

‘द ओडिसी’ प्रदर्शित झाल्यानंतर शुक्रवारी ‘धमाल 4’च्या कमाईवर स्पष्ट परिणाम दिसून आला. आतापर्यंत चित्रपट दररोज सुमारे 6 कोटी रुपयांच्या आसपास कमाई करत होता; मात्र शुक्रवारी कमाईत मोठी घसरण नोंदवली गेली.

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘धमाल 4’ने आतापर्यंत 7,885 शोसह देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 99.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रिलीजच्या आठव्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी चित्रपटाने 3.95 कोटी रुपयांची कमाई केली, जी मागील दिवसांच्या तुलनेत लक्षणीयरित्या कमी आहे. 

‘धमाल 4’ कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 100 कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचलेला ‘धमाल 4’ जगभरातही चांगली कामगिरी करत आहे. अजय देवगणच्या या मल्टिस्टार चित्रपटाने आतापर्यंत 132.74 कोटी रुपयांचं जागतिक कलेक्शन केलं आहे. त्यापैकी 18.25 कोटी रुपये ओव्हरसीज मार्केटमधून आले आहेत. शुक्रवारी कमाईत घसरण झाली असली तरी, आता ‘द ओडिसी’च्या प्रचंड क्रेझसमोर ‘धमाल 4’ पुन्हा जोरदार पुनरागमन करू शकते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. OTT रिलीजबाबत बोलायचं झाल्यास, थिएटरमधील प्रदर्शनानंतर ‘धमाल 4’ नेटफ्लिक्स (Netflix) वर स्ट्रीम होणार आहे.

'द ओडिसी'ची एवढी क्रेझ का?

क्रिस्टोफर नोलनचा नवा चित्रपट 'द ओडिसी' (The Odyssey) प्रदर्शित होण्यापूर्वीच जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. भारतातही या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुकता असून, IMAX शोच्या तिकिटांसाठी चाहते 700 ते 3000 रुपये मोजण्यासही तयार आहेत. 'इन्सेप्शन', 'इंटरस्टेलर', 'डंकर्क', 'टेनेट' आणि ऑस्कर विजेता 'ओपेनहायमर' यांसारखे चित्रपट दिल्यानंतर नोलन यांचा प्रत्येक नवा चित्रपट हा चाहत्यांसाठी मोठा सिनेमॅटिक इव्हेंट ठरतो. त्यामुळे 'द ओडिसी'बाबतही प्रचंड उत्सुकता आहे.हा चित्रपट प्राचीन ग्रीक कवी होमर यांच्या 'द ओडिसी' या महाकाव्यावर आधारित आहे. ट्रोजन युद्धानंतर ओडिसियसच्या घरी परतण्याच्या साहसी आणि रोमांचकारी प्रवासाची कथा या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Embed widget