बापरे बाप! हिमेश रेशमियाचा खतरनाक पिक्चर! केजीएल, ॲनिमल विसरून जाल; Badass Ravi Kumar चा ट्रेलर एकदा पाहाच
गायक हिमेश रेशमियाचा एक नवा चित्रपट येतोय. या चित्रपटात भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात बडे कलकार असणार आहेत.
मुंबई : पार्श्वगायक आणि संगीतकार हिमेश रेशमियाचे (Himesh Reshammiya) बॉलिवुडमध्ये वेगळे स्थान आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्याने आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केलेला आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांना संगीत देण्याचं काम केलंय. विशेष म्हणजे कठीण आणि नाजूक परिस्थितीतून आलेल्या कित्येक गायकांना त्याने मदतीचा हात दिलेला आहे. गाणे गाण्याची संधी देऊन त्याने अनेकांना मोठं केलंय. दरम्यान, याच हिमेश रेशमियाचा आता दमदार आणि सर्वांनाच थक्क करून सोडणारा एक चित्रपट येत आहे. या चित्रपटाचे नाव Badass Ravi Kumar असे असून त्याचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आहे. ट्रेलरमधील अॅक्शन, संवाद पाहून सगळेजण भारावून गेले आहेत.
Badass Ravi Kumar चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च
हिमेश रेशमिया अगोदर फक्त संगीत क्षेत्रात काम करणारा कलाकार अशी त्याची ओळख होती. मात्र आता त्याने थेट अभिनय क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. तो Badass Ravi Kumar या चित्रपटात थेट मुख्य नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अनेक बडे कलाकार आहेत. सनी लियोनीसारखी प्रसिद्ध अभिनेत्रीदेखील या चित्रपटात आहे. या चित्रपटातील संवाद, मारझोडीचे चित्रण अत्यंत रोचक असे आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेकांनी हिमेश रेशमियाच्या कामाचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट अॅनिमल, केजीएफ अशा बड्या चित्रपटांनाही मागे टाकणार, असे हिमेश रेशमियाचे चाहते म्हणत आहेत.
7 फ्रेब्रुवारी रोजी चित्रपट होणार प्रदर्शित
Badass Ravi Kumar या चित्रपटाचा ट्रेलर आजच रिलिज झाला असून अवघ्या तीन तासांत त्याला आतापर्यंत साधारण 30 लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. येत्या 7 फ्रेब्रुवारी रोजी हा चित्रपट संपूर्ण देशभरात प्रर्शित होणार आहे. या चित्रपटात हिमेश रेशमिया, प्रभू देवा, सोनिया कपूर आदी बडे कलाकार आहेत.
View this post on Instagram
चित्रपट कमाल करणार का?
दरम्यान, हिमेश रेशमिया याआधीही अनेक चित्रपटांत झळकलेला आहे. त्याने कर्झ, द एक्स्पोस अशा मोठ्या चित्रपटांत झळकलेला आहे. त्यानंतर आता त्याचा Badass Ravi Kumar हा चित्रपट येत आहे. हा चित्रपट नेमकी काय कमाल दाखवणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :