Hema Malini Explains Dharmendra Funeral Quickly: ...म्हणून चाहत्यांना धर्मेंद्रंचं अंत्यदर्शन घेता आलं नाही; अखेर हेमा मालिनींनी 'ते' गुपित सांगितलं
Hema Malini Explains Dharmendra Funeral Quickly: धर्मेंद्र यांच्यावरचे अंत्यसंस्कार एवढ्या घाईघाईत का उरकण्यात आले? यावर आता त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्पष्टीकरण दिलंय.

Hema Malini Explains Dharmendra Funeral Quickly: बॉलिवूडचे (Bollywood News) दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांची आज जयंती, काही दिवसांपूर्वीच चाहत्यांच्या लाडक्या 'ही-मॅन'नं आपल्या सर्वांचा निरोप घेतला. गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे धर्मेंद्र (Dharmendra) यांच्यावर उपचार सुरू होते. पण, अखेर त्यांनी या जगाला कायमचं अलविदा म्हटलं आणि अवघी सिनेसृष्टी पोरकी झाली. धर्मेंद्र यांच्या जाण्यानं फक्त देओल कुटुंबीय आणि सिनेसृष्टीवरच दुःखाचा डोंगर कोसळला नाहीतर, चाहतेही दुखात बुडाले. धर्मेंद्र यांच्या जाण्यानं त्यांच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या चाहत्यांना अतीव दुःख झालं. पण, त्यांच्या लाडक्या अभिनेत्याला त्यांना शेवटचं पाहताही आलं नाही. धर्मेंद्र यांचं अंत्यदर्शन घेण्याची चाहत्यांची इच्छा अपूर्ण राहिली. देओल कुटुंबीयांनी कुणाला काही कळण्यापूर्वीच अंत्यसंस्कार उरकले. तेव्हापासूनच दिग्गज अभिनेत्याचे अंत्यसंस्कार कुटुंबियांनी घाईघाईत का उरकले? चाहत्यांना लाडक्या अभिनेत्याचं अंत्यदर्शन घेता आलं नाही. धर्मेंद्र यांना राजकीय सन्मान मिळायला हवा होता, पण त्यांचे अंत्यसंस्कार घाईघाईत उरकल्यामुळे तेसुद्धा झालं नाही. असं का झालं? आता या सर्व प्रश्नांची उत्तरं धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी (Hema Malini) यांनी दिलं आहे.
धर्मेंद्र आणि त्यांच्या प्रकृतीबबात कित्येक दिवसांपासून अफवा पसरत होत्या. त्यानंतर देओल कुटुंबीयांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अपडेट जाहीरपणे सांगितली नाही. ज्यावेळी देओल कुटुंबीयांच्या घरातून रुग्णवाहिका बाहेर पडताना दिसली, त्यावेळी लोकांपर्यंत धर्मेंद्र यांच्या मृत्यूची बातमी पोहोचली. हे सर्व असं का घडलं याचं कारण आता हेमा मालिनी यांनी उघड केलं आहे.
यूएई चित्रपट निर्माते हमद अल रायमी यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यावरचे अंत्यसंस्कार एवढ्या घाईघाईत का उरकण्यात आले? यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
निर्माते हमद अल रायमी यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
चित्रपट निर्माते हमद अल रायमी यांनी हेमा मालिनी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला असून अरबी भाषेत एक पोस्ट शेअर केली आहे. हमद अल रायमी पोस्टमध्ये लिहिलंय की, "शोकाच्या तिसऱ्या दिवशी, मी दिवंगत सुपरस्टार धर्मेंद्र यांच्या पत्नी प्रसिद्ध कलाकार हेमा मालिनी यांना भेटायला गेलो. मी त्यांना पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटलो. मी त्यांना दुरून अनेक वेळा पाहिलं आहे, पण यावेळी काहीतरी वेगळंच होतं... एक वेदनादायक, हृदयद्रावक क्षण, एक दुःख जे समजण्यापलीकडे आहे, मी कितीही प्रयत्न केले तरी मी ते समजू शकणार नाही... मी त्यांच्यासोबत बसलो आणि त्यांच्या चेहऱ्यावरील अंतर्गत गोंधळ पाहू शकलो, जो त्या लपवण्याचा प्रयत्न करत होत्या..."
View this post on Instagram
चित्रपट निर्मात्यानं पुढे लिहिलंय की, हेमा मालिनी यांनी त्यांना हे देखील सांगितलं की, त्यांनी धर्मेंद्र यांना वारंवार त्यांच्या कविता पुस्तकात स्वरुपात प्रकाशित करण्यास सांगितलेलं... पण ते नेहमीच मी आणखी काही लिहितो, मग पाहू... असंच म्हणायचे. चित्रपट निर्मात्यानं लिहिलंय की, "ती (हेमा मालिनी) मला दुःखानं म्हणाली की, 'आता अनोळखी लोक येतील... ते त्यांच्याबद्दल लिहतील, ते त्यांच्याबद्दल पुस्तकं लिहतील... तर त्यांचे शब्द कधीही उघड होणार नाहीत..." मग, अतीव दुःखानं हेमा मालिनी म्हणाल्या की, त्यांना या गोष्टीचं फारच वाईट वाटतंय की, त्यांचे चाहते, त्यांना शेवटचं पाहू शकले नाहीत.
हेमा मालिनी यांनी स्पष्ट केलंय की, "धर्मेंद्र यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांना कोणीही कमकुवत झालेलं किंवा आजारी पडलेलं पाहावं असं वाटत नव्हतं. त्यांनी अनेकदा त्यांचं दुःख आपल्या अगदी जवळच्या व्यक्तींपासून नातेवाईकांपासूनही लपवलंय. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर, कुटुंबाला निर्णय घ्यावा लागतो..."
चित्रपट निर्मात्यानं पुढे लिहिलंय की, ती थांबली, अश्रू पुसले आणि स्पष्टपणे म्हणाली, "जे काही झालं ते केवळ दयेच्या भावनेतून करण्यात आले. तुम्हाला त्यांना (धर्मेंद्र) त्या अवस्थेत पाहवले नसते. शेवटच्या काही दिवसांत त्यांची प्रकृती खूपच बिघडली होती. त्यांना प्रचंड वेदना व्हायच्या. त्यांच्या या वेदना बघणे आम्हालाच सहन होत नव्हते..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























