'पैसे पाहिजेत..? पैसे पाहिजेत..?, ' धर्मेंद्रंच्या अस्थि विसर्जन केल्यानंतर सनी देओल चिडला; पॅपाराझीचा कॅमेरा खेचला
Sunny Deol Angry On Paparazzi: धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी त्यांचे दोन लेक बॉबी देओल आणि सनी देओल हरिद्वारला पोहोचले होते. या दिग्गज अभिनेत्याच्या अस्थी हरिद्वारमध्ये विसर्जित करण्यात आल्या.

Sunny Deol Angry On Paparazzi: बॉलिवूडचे (Bollywood News) 'ही-मॅन' धर्मेंद्र (Dharmendra) यांचं निधन झालंय. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याच्या निधनानंतर अख्खी फिल्म इंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे. धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांचं जाणं चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या अख्ख्या देओल कुटुंबीयांवर (Deol Family) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्यापासूनच त्यांच्याबाबत माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे देओल कुटुंबीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलेला. वडिलांच्या प्रकृती आणि मृत्यूच्या कव्हरेजमुळे देओल कुटुंब आधीच मीडियावर नाराज होतं. आजारी धर्मेंद्र यांच्या कव्हरेजमुळे सनी देओल संतापलेलाही, त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालेला. अशातच आता धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या सनी देओलनं पुन्हा एकदा पॅपाराझींवर आपला राग व्यक्त केला आहे. एवढंच काय तर, सनी देओलनं त्याच्या हातातून कॅमेराही हिसकावून घेतला आहे.
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी त्यांचे दोन लेक बॉबी देओल आणि सनी देओल हरिद्वारला पोहोचले होते. या दिग्गज अभिनेत्याच्या अस्थी हरिद्वारमध्ये विसर्जित करण्यात आल्या. त्यावेळी धर्मेंद्र यांचा धाकटा लेक बॉबी देओलचा अश्रूंचा बांध फुटला आणि तो ढसाढसा रडू लागला. अस्थी विसर्जनावेळी सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यावर पॅपाराझींनी कॅमेरे रोखले होते. त्यावेळी सनी देओलला राग अनावर झाला आणि त्यानं तिथे उभ्या असलेल्या एका पॅपाराझीला सुनव सुनव सुनावलं.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सनी देओल एका पॅपाराझींवर चिडल्याचं पाहायला मिळतंय. व्हिडिओमध्ये, तो पॅपाराझींचा कॅमेरा हिसकावून घेत म्हणाला की, "असं करू नकोस... जर तुम्हाला पैसे हवे असतील तर ते घे..." हा व्हिडीओ हरिद्वारचा असल्याचा दावा सध्या केला जातोय, जेव्हा देओल कुटुंब धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी गेले होते.
"पैसे चाहिए तेरे को कितने पैसे चाहिए"
— Abhishek (@vicharabhio) December 3, 2025
This happened when Dharam Ji's asthi visarjan was going on at Haridwar and someone started recording them secretly.
Sunny Deol's anger is totally justified,
Respect the family in tough situations or face the heat.
pic.twitter.com/VFw1jCNByx
धर्मेंद्रंच्या अस्थी विसर्जनासाठी संपूर्ण कुटुंब हरिद्वारला
सनी देओलचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतंय. अनेक सोशल मीडिया युजर्स व्हिडीओवर कमेंट करत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनाबद्दल, अंत्यसंस्कारानंतरचे विधी आता सुरू आहेत. धर्मेंद्र यांच्या चितेची राख त्यांच्या फार्महाऊसवर विखुरल्या गेल्याची माहिती मिळतेय, तर अस्थी हरिद्वारला आणण्यात आल्या आहेत. अस्थी विसर्जनासाठी संपूर्ण कुटुंब मंगळवारी हरिद्वारला पोहोचलेलं. बुधवारी संपूर्ण विधींसह धर्मेंद्र यांचं अस्थी विसर्जन करण्यात आलं.
दरम्यान, 27 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांची प्रार्थना सभा झालेली. सनी देओल, बॉबी देओल आणि कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते आणि संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री यावेळी देओल कुटुंबाच्या पाठीशी उभी होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























