नशीबानं कशी थट्टा मांडली! लोकप्रिय बाल कलाकाराची अवस्था बिकट; फाटलेले कपडे घालून रस्त्यावर फिरताना दिसला
Harsh Reality of Child Star Tyler Chase:टायलर चेस हा एकेकाळी प्रसिद्ध बाल कलाकार होता. सोशल मीडियवर त्याचा बिकट अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Harsh Reality of Child Star Tyler Chase: ग्लॅमरचे जग बाहेरून जितके झगमगाटी आणि स्वप्नाळू वाटते. तितकेच त्यामागील वास्तव अनेकदा वेदनादायक असते. प्रसिद्धीचा सूर्य कधी उगवतो तर, कधी अचानक मावळतो. या सिनेसृष्टीत कधीही यशाची हमी दिली जात नाही. कारण नशीब, कठोर परिश्रम आणि परिस्थिती एकत्रितपणे एखाद्याचे भविष्य ठरवतात. अनेक कलाकारांनी अगदी लहान वयातच प्रसिद्धी पाहिली आहे. परंतु, कालांतराने सर्व काही गमावले देखील आहे. या इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल कुणालाही चुकलेला नाही.
या झगमगाट, टाळ्या आणि स्टारडमच्यामागे एक असं जग आहे, जिथे एकटेपणा, संघर्ष आणि मानसिक ताण सामान्य आहे. अशातच एका बाल कलाकाराचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. या अभिनेत्याची बिकट परिस्थिती पाहून अनेकांना धक्का बसला आहे. टायलर चेस असे बाल कलाकाराचे नाव आहे. टायलर हॉलिवूड (Nickelodeon Star Tylor) कलाकार असून, त्यानं अनेक हॉलिवूड सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. एकेकाळी प्रकाशझोतात असणार्या टायलरची अवस्था आता दयनीय झाली आहे. माहितीनुसार, त्यानं बाल कलाकार म्हणून अनेक टिव्ही शो आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.
व्हायरल व्हिडिओतून टायलक चेसची बिकट परिस्थिती उघड
अलिकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये टायलर चेस कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर फिरताना दिसत होता. या व्हिडिओत टायलर चेसची परिस्थिती अत्यंत बिकट दिसत आहे. शर्ट- पॅन्ट फाटलेली, दाढी वाढलेली, जुने - फाटलेले बूटमध्ये टायलर रस्त्यांवरून फिरताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहून चाहत्यांना धक्काच बसला. माहितीनुसार, टायलर चेसने निकेलोडियन चॅनेलमधील लोकप्रिय शो डिक्लासिफाइ़ड स्कूल सर्व्हायव्हल गाइड यात मार्टिनची भूमिका साकारली होती.
This is genuinely heartbreaking 💔
— Clown World ™ 🤡 (@ClownWorld) December 21, 2025
No one should end up like this pic.twitter.com/SVHHjWYIfi
या भूमिकेमुळे तो रातोरात प्रकाशझोतात आला होता. व्हिडिओ व्हायरल होताच, सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी टायलरसाठी निधी उभारण्याचा प्रयत्न केला. परंतु, नंतर टायलरच्या कुटुंबाने हा उपक्रम थांबवला. कुटुंबाचे म्हणणे आहे की, टायलरला पैशांपेक्षा वैद्यकीय काळजी आणि मानसिक आधाराची गरज आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, योग्य उपचार आणि भावनिक आधारनेच टायलरची प्रकृती सुधारू शकते. दरम्यान, टायलर चेसचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, चाहत्यांनी कमेंटद्वारे चिंता व्यक्त केली आहे.























