एक्स्प्लोर

Har Har Mahadev : 'हर हर महादेव!'; झी स्टुडिओची प्रेक्षकांना खास भेट, राज ठाकरेंच्या आवाजात घुमली महागर्जना

अभिजित शिरीष देशपांडे (Abhijit Deshpande) लिखित- दिग्दर्शित, झी स्टुडिओज आणि गणेश मार्केटिंग फिल्म्स निर्मित 'हर हर महादेव' हा महासिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे

Har Har Mahadev : हर हर महादेव... मराठी मनाला चेतवणारी, आपल्यात स्फुलिंग निर्माण करणारी, रक्त सळसळवणारी गर्जना ! सह्याद्रीच्या कडेकपारातून , सिंधुदुर्गाच्या लाटांमधून, देवगिरीच्या अभेद्य भिंतीमधून ते अटकेपार फडकवणाऱ्या भगव्या ध्वजापर्यंत जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची मोहोर उमटली तिथे तिथे या गर्जनेने आसमंत दणाणून सोडला ! या गर्जेनशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक लढाईत ही गर्जना म्हणजे लढण्याचं बळ देणारी जणू उर्जाच होती ! हीच ऊर्जा आता परत एकदा अनुभवायला मिळणार आहे कारण ही महागर्जना आता मोठ्या पडद्यावरून एका भव्य दिव्य सिनेमाच्या माध्यमातून घुमणार आहे. आजवर प्रेक्षकांना एकाहून एक सरस चित्रपट देणाऱ्या झी स्टुडिओजने या दिवाळीत प्रेक्षकांसाठी एक खास नजराणा आणला आहे ! अभिजित शिरीष देशपांडे (Abhijit Deshpande) लिखित- दिग्दर्शित, झी स्टुडिओज आणि गणेश मार्केटिंग फिल्म्स निर्मित 'हर हर महादेव' हा महासिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ! या चित्रपटाचा एक विशेष आवाज लाभलेला खास टिझर आज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. राज ठाकरे  (Raj Thackeray)  यांच्या धीरगंभीर आवाजाने सजलेली 'हर हर महादेव' या चित्रपटाची ही विशेष झलक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे . 
'जेव्हा मायमाऊलीची बेअब्रू  आणि मंदिराला तडा गुन्हा नव्हता 
जेव्हा सह्याद्रीला कणा आणि
मराठीला बाणा नव्हता..
ही  350 वर्षानंतरच्या  पहाटफुटीची गोष्ट आहे..
ही अठरापगड आरोळ्यांची ,
आणि माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे..
हर हर महादेव !'
या अशा प्रेरणादायी वाक्यांनी सज्ज असलेला हा टिझर प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. आजवर झी स्टुडिओजने एकाहून एक दर्जेदार कलाकृती आपल्या प्रेक्षकांना दिल्यात. याच पंक्तीत आता 'हर हर महादेव' हे आणखी एक नाव दिमाखदारपणे सामील होणार आहे.

Har Har Mahadev : 'हर हर महादेव!'; झी स्टुडिओची प्रेक्षकांना खास भेट, राज ठाकरेंच्या आवाजात घुमली महागर्जना नुकतीच महाराष्ट्र राज्य सरकारने काही निवडक शहरांमध्ये चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली. याच आनंददायी घोषणेचं औचित्य साधून प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी 'हर हर महादेव' या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. शिवप्रेमी राज ठाकरे यांच्या दमदार आवाजाने सजलेला हा टिझर चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करेल यात शंकाच नाही.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Aavarapan 2 Box Office collection: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Mahesh Kothare on Inspector Jadhav: कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Embed widget