एक्स्प्लोर

Jai Jai Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ

Guru Pournima special: 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा अलौकिक अनुभव.

Guru Pournima special Jai Jai Swami Samarth: कलर्स मराठीवरील (Colors Marathi) 'जय जय स्वामी समर्थ' (Jai Jai Swami Smarth) मालिकेने नुकताच 1900 भागांचा पल्ला गाठला. आणि म्हणूनच यंदाची गुरुपौर्णिमा (Guru Pournima) 'जय जय स्वामी समर्थ'च्या प्रेक्षकांसाठी ठरणार आहे भक्ती, चमत्कार आणि गुरुकृपेचा एक अद्वितीय सोहळा. या विशेष एपिसोडमध्ये प्रथमच प्रेक्षकांना लाभणार आहे परब्रह्माच्या पाच दिव्य गुरुरूपांचे भव्य दर्शन आणि स्वामी समर्थांच्या कृपेने गुरुमंत्र प्राप्तीचा अलौकिक क्षण, जो मालिकेच्या इतिहासातील सर्वात भव्य आणि अविस्मरणीय प्रसंग ठरणार आहे.

स्वामी समर्थांवरील अखंड श्रद्धेने प्रेरित होऊन कावेरीने अक्कलकोटकडे जाण्याचा निर्धार केला. मात्र तिच्यासाठी हा प्रवास कधीच सोपा नव्हता. तिच्या भक्तीला खीळ घालण्यासाठी आणि तिचं प्रारब्ध बदलण्यासाठी नकारात्मक शक्तींनी वारंवार कटकारस्थानं रचली. कधी तिचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला, कधी तिचा विश्वास डळमळीत करण्याचा, तर कधी तिच्या नशिबावरच डल्ला मारण्याचा. प्रत्येक संकटानंतरही स्वामींच्या कृपेने कावेरी पुन्हा उभी राहिली आणि तिचा प्रवास सुरूच राहिला.

गुरु पौर्णिमा विशेष, 'जय जय स्वामी समर्थ'(Guru Pournima special Jai Jai Swami Samarth)

याच प्रवासात तिच्या आयुष्यात आला शिवा - खऱ्या गुरूच्या शोधात घरदार सोडून भटकणारा एक तरुण. नियतीने वारंवार कावेरी आणि शिवाची भेट घडवली. हा केवळ योगायोग होता, की स्वामींची आखलेली दैवी योजना? एकमेकांच्या आयुष्यात ते कोणती भूमिका निभावणार आहेत? त्यांच्या भेटीमागचं रहस्य गुरुपौर्णिमेच्या दिवशी उलगडणार आहे. याहूनही मोठं रहस्य म्हणजे कावेरीचं हरवलेलं नशीब. मालिकेच्या सुरुवातीपासून स्वामींनी कावेरीला दिलेलं एक वचन, "तुझं हरवलेलं नशीब तुला परत मिळेल." त्या एका वचनाची पूर्तता अखेर गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी होणार आहे.

पण कावेरीचं हरवलेलं नशीब नेमकं काय आहे? ते तिच्यापासून दूर कसं गेलं? आणि ते तिला पुन्हा कसं मिळणार?  कावेरीच्या हरवलेल्या नशिबाशी कायमच गूढरित्या जोडला गेलेला रामाप्पा या सर्व घडामोडींमध्ये कोणती भूमिका बजावणार? त्याच्या आयुष्यात कोणतं मोठं वादळ येणार? स्वामींच्या लीलेमुळे त्याचं भविष्य कोणत्या अनपेक्षित वळणावर येऊन उभं राहणार? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना थक्क करून सोडणार आहेत.

अनेक कठीण परीक्षा, अनपेक्षित चमत्कार आणि दैवी संकेत अनुभवत अखेर कावेरीच्या भक्तीचा परमोच्च क्षण जवळ येतो. गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी तिला लाभणार आहे, पाच दिव्य गुरुरूपांचे अलौकिक दर्शन एक असा साक्षात्कार, जो अनेक जन्मांच्या तपश्चर्येनंतरही लाभणे दुर्लभ मानला जातो, आणि तिच्या निस्सीम श्रद्धेचं सर्वोच्च फळ म्हणून स्वामी समर्थ स्वतः तिला प्रदान करणार आहेत, परमशक्तिशाली गुरुमंत्र एक असा दैवी आशीर्वाद, जो तिच्या आयुष्याचाच नव्हे तर प्रारब्धाचाही नवा अध्याय सुरू करणार आहे.

कावेरीचं हरवलेलं नशीब तिला कसं मिळणार? शिवाला त्याचा खरा गुरु लाभणार का? रामाप्पाच्या आयुष्यात कोणता धक्कादायक बदल होणार? पाच गुरुरूपांच्या दर्शनामागचं दैवी रहस्य काय आहे? आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ आपल्या भक्तांसाठी कोणती अद्भुत लीला प्रकट करणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं अनुभवण्यासाठी पाहायला विसरू नका 'जय जय स्वामी समर्थ'चा गुरुपौर्णिमा विशेष एपिसोड श्रद्धा, भक्ती, गुरुकृपा, दैवी चमत्कार आणि प्रारब्ध बदलणाऱ्या स्वामींच्या लीलांचा एक नेत्रदीपक, आत्म्याला स्पर्श करणारा आणि अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव.

नक्की पहा गुरुपौर्णिमा विशेष भाग 29 जुलै आणि 30 जुलै रात्री 8:10 वा.आपल्या कलर्स मराठीवर.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde On Bollywood Actors Pan Masala Advertisement: शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
Advertisement

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget